Sunday, August 3, 2025
Homeराजकीय घडामोडीराजू शेट्टी विरोधकांच्या बैठकीला जाणार? स्वत:च खुलासा करत म्हणाले, मोदी सरकारला विरोध...

राजू शेट्टी विरोधकांच्या बैठकीला जाणार? स्वत:च खुलासा करत म्हणाले, मोदी सरकारला विरोध करण्यासाठी..

येत्या 31 ऑगस्ट व एक सप्टेंबरला मुंबईत होणाऱ्या ‘इंडिया’ आघाडीच्या बैठकीला उपस्थित राहणार नसल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते व माजी खासदार राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी स्पष्ट केले आहे.दिल्लीत पत्रकारांशी बोलताना शेट्टी म्हणाले, “या बैठकीला उपस्थित राहण्याच्या संदर्भात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दूरध्वनी केला होता. त्यांनी या बैठकीला उपस्थित राहावे, अशी विनंती केली. परंतु, महाविकास आघाडीबाबत मला आलेला अनुभव फारसा चांगला नाही. मोदी सरकारला विरोध करण्यासाठी ‘इंडिया’ आघाडीत जाणं मला आवश्यक वाटत नाही, असं ते म्हणाले.राष्ट्रवादी काँग्रेसमधील शरद पवार व अजित पवार यांच्या गटांमध्ये सुरू असलेल्या वादावर बोलताना राजू शेट्टी म्हणाले की, “या दोन्ही नेत्यांमध्ये नातेसंबंध असले तरी राजकारणातील भूमिकेत मात्र स्पष्टता आली पाहिजे. ही स्पष्टता अद्याप तरी दिसत नाही. त्यामुळे शरद पवार यांनी या संदर्भात काही कठोर भूमिका घेण्याची आवश्यकता आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -