शहरातील (Gadhinglaj) २१ जणांवर काल रात्री आठच्या सुमारास एका पिसाळलेल्या कुत्र्याने (Dog) हल्ला केला. या घटनेत जखमी झालेल्यांवर उपजिल्हा रुग्णालयात रात्री उशिरापर्यंत उपचार सुरू होते. रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांनी रुग्णालयात गर्दी केली होतीविकास माळी (करंबळी), उमा सावंत, रूपा खनगावे, वैदिका देशपांडे, अंजना जाधव, आराध्या अजगेकर, केतकी शिंदे, पोपट तिबिले, संगीता बिरंजे, हर्षदा जडे, बबलू कुमार, निखिल येसरे, अरुण पोवार (रा. गडहिंग्लज), अमृता धनवडे (भडगाव), संजय कडुकर (गिजवणे), धर्मेंद्र कांबळे (बेळगुंदी), सुनील महाडिक (मुगळी), मुज्जमेल म्हाबर (गिजवणे), जीवन बोकडे (मलिग्रे), शालन पाटील (इंचनाळ) अशी जखमींची नावे आहेत.जखमीतील आराध्या व हर्षदा या दोघी चिमुकल्या आहेत. काल रात्री आठच्या सुमारास पिसाळलेल्या कुत्र्याने सरस्वती नगरात पहिल्यांदा हल्ला केला.
त्यानंतर कुत्र्याने भरवस्तीत येऊन शिवाजी बँक परिसर आणि बसस्थानक आवारातील नागरिकांवर हल्ला करून जखमी केलेहळूहळू उपजिल्हा रुग्णालयात जखमी नागरिक अँटी रेबीज लस घेण्यासाठी येऊ लागले. तासाभरात जखमींची संख्या २१ वर पोहोचली आहे. रात्री उशिरापर्यंत वैद्यकीय अधीक्षक डॉ. सी. जे. खोत यांच्या नेतृत्वाखाली वैद्यकीय अधिकाऱ्यांचे पथक जखमींवर उपचार करीत होते. जखमींमध्ये लहान मुले, महिलांचाही समावेश आहे.रात्री उशिरापर्यंत कुत्र्याचा शोधदरम्यान, या घटनेची माहिती मिळताच पालिका कर्मचाऱ्यांकडून त्या कुत्र्याचा शोध रात्री उशिरापर्यंत सुरू होता. पांढऱ्या रंगाच्या या कुत्र्याच्या शरीरावर तपकिरी रंगाचे पट्टे आहेत. शहरातील सर्व भागात फिरून या कुत्र्याचा माग काढण्यासाठी कर्मचारी प्रयत्न करत होते.