कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघात दोन्ही ठिकाणी आपल्याच पक्षाचा उमेदवार असावा अशी सर्वच नेते पदाधिकान्यांनी उद्धव ठाकरे यांच्यासमोर बैठकीत इच्छा व्यक्त केली. दोन्ही लोकसभा मतदारसंघातील स्थितीचा विधानसभा मतदारसंघनिहाय आढावा उद्धव ठाकरे यांनी शनिवारी जिल्ह्यातील स्थानिक नेत्यांकडून घेतला. दोन्ही मतदारसंघात शिवसेनेचे खासदार शिंदे गटात गेले असले, तरी मतदार हा ठाकरेंसोबत आहे, असे मत या बैठकीत व्यक्त करण्यात आले.
आढावा बैठकीत उद्धव ठाकरे यांनी जिल्ह्यातील नेते आणि पदाधिकाऱ्यांना कानमंत्र दिला.
दोन्ही लोकसभा मतदारसंघात काहीही
आढावा बैठकीत उद्भव ठाकरेंना पदाधिकाऱ्यांचे साकडे
होऊ द्या, पण भाजपचा उमेदवार विजयी होता कामा नये, अशा सूचना उद्धव ठाकरे यांनी या बैठकीत नेत्यांना तसेच पदाधिकाऱ्यांना दिल्या. ते पुढे म्हणाले की, आपण महाविकास आघाडीमध्ये आहोत. इंडिया आघाडीत निवडणुकीला सामोरे जाणार आहोत.
मात्र, कोणत्याही परिस्थितीसाठीआपल्या पक्षाने तयारी करावी. वेळ आली तर स्वबळाची तयारी सुद्धा पक्षाची असली पाहिजे, अशी आपली तयारी आतापासूनच सुरू करा
असे ठाकरे यांनी नेत्यांना आढावा बैठकीत केले.
दरम्यान, आढावा बैठकीनंतर शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघात उमेदवार शिवसेनेचाच असला पाहिजे, ही प्रत्येक शिवसैनिकाची भूमिका आहे. शेवटी निर्णय उद्धव साहेबांचा असतो. मातोश्रीच्या निर्णयानुसार आम्ही काम करत राहणार. आम्ही ३५ ते ४० वर्ष राबत आहोत, तिथे आम्हाला वाटते शिवसेनाचाच उमेदवार असावा असे वाटते. भविष्यात दोन्ही मतदारसंघात ठाकरे गटाचाच खासदार असणार ही अपेक्षा आहे.
लोकसभेसाठी हातकणंगले कोल्हापुरात उसना उमेदवार नको
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -