शखाखाचा धाक दाखवून जर्मनी गंगच्या नावाने दहशत
माजवत हॉटेल व्यावसायिकाकडे चार हजार रुपयांची खंडणी मागितल्या प्रकरणी सहाजणांवर शिवाजीनगर पोलिसात गुन्हादाखल करण्यात आला आहे. फिर्याद दिली आहे. त्यामध्ये बजरंग फातले,शुभम पट्टणकुडे, अमर शिंगे, लोखंडे वअनोळखी दोघांचासमावेश आहे. या प्रकरणी उमेश मदन म्हेत्रे (वय ४५ रा. भोनेमाळ) यांनीयाबाबत पोलिसांतून मिळालेली माहिती अशी,फिर्यादी उमेश म्हेत्रे हे हॉटेल व्यावसायिकअसून कोल्हापूर रोडवरील एएससी कॉलेजसमोरत्यांचे पवन नावाने हॉटेल आहे.
शुक्रवारी दुपारच्या सुमारास उमेश म्हेत्रे हे हॉटेलमध्ये असताना त्यांच्या ओळखीचे बजरंग फातले, अमर शिंगे, शुभम पट्टणकुडे, लोखंडे आणि अन्य दोघे असे सहाजण हॉटेलमध्ये आले. त्यांनी म्हेत्रे यांच्याकडे जर्मनी गँगच्या नावाने दहशत माजवत आम्ही आनंद्या जर्मनी गँगचे असून तू आम्हांला ओळखत नाहीस काय? असे म्हणत म्हेत्रे व त्यांच्या मुलाच्या अंगावर धावून जात त्यांना शिवीगाळ करत धक्काबुक्की केली. पट्टणकुडे याने हातातील काठीने मुलगा श्री याच्या पायावर मारहाण केली. तर फातले याने म्हेत्रे यास ढकलून देत चाकूचा धाक दाखवत टेबलच्या ड्रॉव्हरमधील ७ हजाराची रोकड काढून घेतली.
पोलिसात गेल्यास जिवंत सोडणार नाही, अशी धमकी देत सर्वजण निघून गेले. या घटनेची माहिती समजताच शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजू ताशिलदार व पोलीस कर्मचान्यासह घटनास्थळी धाव घेत झाल्या प्रकाराची माहिती घेतली. आठवडाभरापूर्वी एका व्यावसायिकाचे अपहरण केल्याची घटना ताजी असताना पुन्हा जर्मनी गंगच्या नावाने हॉटेल व्यावसायिकाकडे खंडणी मागण्याच्या प्रकाराने शहरात खळबळ उडाली आहे.
हॉटेल व्यावसायिकाकडे खंडणी मागणाऱ्या सहाजणांवर गुन्हा दाखल
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -