Monday, July 28, 2025
Homeकोल्हापूरआय एम साॅरी! एकतर्फी प्रेमातून तरुणाची आत्महत्या 

आय एम साॅरी! एकतर्फी प्रेमातून तरुणाची आत्महत्या 

नैराश्य आणि एकतर्फी प्रेमातून आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय उचलण्याची धक्कादायक मालिका कोल्हापूर जिल्ह्यात सुरुच आहे. आता या मालिकेत जिल्ह्यातील चंदगड तालुक्यातील तरुणाची भर पडली आहे. एकतर्फी प्रेमातून अपयश आल्याने विठ्ठल रोंगाप्पा जाधव (वय 21, रा. मलगड) असे त्या तरुणाचे नाव आहे. एकतर्फी प्रेमातून त्याने आयुष्याचा शेवट केला. मंगळवारी ही उघडकीस आली. या घटनेची नोंद चंदगड पोलिसांत झाली आहे. विठ्ठलचे एका मुलीवर एकतर्फी प्रेम होते. या घटनेची माहिती संबंधित मुलीच्या वडिलांना मिळाल्यानंतर त्यांनी निर्भया पथकाच्या माध्यमातून समुपदेशन केले होते. यानंतर नैराश्यात गेलेल्या विठ्ठलने काजूच्या झाडाला गळफास घेत आत्महत्या केली. 

दरम्यान, त्याने आत्महत्या करण्यापूर्वी चिठ्ठी लिहून ठेवली आहे. यामध्ये त्या मुलीने माझा केवळ वापर केला. निर्भया पथकाची भीती दाखवून त्यांनी माझ्याकडून तिला परत मेसेज न करण्याचे जबरदस्तीने लिहून घेतले आहे. तिला मी विसरू शकत नसल्याने शेवटचा हा पर्याय निवडला. आय एम सॉरी.  

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -