हातकणंगले, महामार्गावरीलरत्नागिरी – नागपूर शिरोली फाटा ते अंकली या ३३ कि.मी. महामार्गाचे काम नोव्हेंबरपासून सूरू होणार आहे. चौपदरी रस्त्यासाठी यापूर्वी रस्त्याच्या मध्यापासून ३५ (मिटरचे’ भूसंपादन झाले आहे. नव्याने १० मिटर पुन्हा भूसंपादन वाढणार आहे. हा रस्ता ४५ मिटरचा होणार आहे. याबाबतचा आराखडा राष्ट्रीय महामार्ग दिल्ली मुख्यालयाकडे अंतिम मंजुरीसाठी पाठवणेत आला असून शिरोली फाटा ते अंकली या दरम्यान दहा उड्डाणपुले होणार आहेत.
नव्याने दहा मिटर भूसंपादन होणार असल्याने शेतकरी, छोटे व्यापारी हवालदिल झाले आहेत. तर नागरी वस्ती असलेल्या अतिग्रे, हातकणंगले तमदलगे, आणि निमशिरगाव या रस्त्याकडेच्या गावातील ग्रामस्थांसमोर र भूसंपादनाविषयी अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.
सुप्रिम कंपनी आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वादात अडकलेला शिरोली फाटा ते अंकली हा ३३ कि.मी. चा राष्ट्रीय महामार्ग २०१७ पासून रखडला आहे. सुप्रिम कंपनी उच्च न्यायालयामध्ये गेल्याने या रस्त्याची डागडूजी आणि पावसाळ्यानंतर खड्डे भरणे हा प्रश्न प्रलंबीत होता. अखेर ११ नोव्हेंबर २०२१ ला हा वादग्रस्त रस्ता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे हस्तांतरीत झाल्याने खड्डे भरणे आणि डागडूजीच्या कामाला सुरुवात झाली आहे.
राष्ट्रीय महामार्ग दिल्ली मुख्यालयाच्या प्राधिकरण कार्यालयाकडे मंजूरीसाठी गेला आहे. अंतिम मंजूरी मिळताच दिवाळीनंतर प्रत्यक्ष कामाला सुरवात होणार आहे.
शिरोली सांगली फाटा ते अंकली दरम्यानच्या ३३ कि.मी. रस्त्याचा नव्याने आराखडा तयार करणेत आला आहे. नवीन आराखडा प्रस्ताव दोन महिन्यापूर्वीच शिरोली फाटा ते अंकली या रस्त्यासाठी यापूर्वी सांगली ते मजले बसवानखिंड पर्यंत रस्त्याच्या मध्य भागापासून दोन्ही बाजूस ३५ मिटरचे भूसंपादन झाले आहे. नव्याने १० मिटर जादा भूसंपादन होवून हा रस्ता ४५ मिटरचा होणार आहे.
यापूर्वी तमदलगे ते अंकली आणि जयसिंगपूर शहर ते अंकली असा दुहेरी मार्ग होता तो रद्द होवून नव्याने तमदलगे ते अंकली असा राष्ट्रीय महामार्ग प्रस्तावित आहे. शिरोली फाटा ते अंकली या रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर चोकाकपासून अंकलीपर्यंत दहा उड्डाणपूल प्रस्तावित आहेत. तसेच चोकाक ते शिये फाटा या रस्त्याचे काम २६ मे २०२३ ला ठेकेदार नियुक्त होऊन सुरू झाल्याने राष्ट्रीय महामार्गाच्या कामाला गती आली आहे.
रत्नागिरी- नागपूर राष्ट्रीय महामार्गाच्या यंत्रणकडून चौक
कामातील अंकली ते चोकाक पर्यंतच्या कामातील
अडथळा दूर झाला आहे.अंकली ते चोकाक दरम्यानचा रस्ता आता ४५ मिटरने प्रस्तावित करणेत आला आहे. या ३३ कि.मी. रस्त्यावर चोकाक, रुकडी फाटा, अतिग्रे इचलकरंजी फाटा, घोडावत कॉलेज, रामलिंग फाटा, हातकणंगले, बसवानखिंड जयसिंगपूर फाटा, तमदलगे, जैनापूर आणि सांगली रोड अशा दहा या राष्ट्रीय महामार्गाच्या चोकाक ते बोरपाडळे पर्यंतच्या रस्त्याचे भूसंपादन महसूल विभागाकडून पूर्ण झाले आहे.
चोकाक, माले, हेरले, मौजे वडगांव, नागाव, या गावातील शेतकऱ्यांना त्यांचा जमिनीचा मोबदला मिळाला असल्याने राष्ट्रीय महामार्ग ते शिये फाटा या रस्त्याच्या कामाचा २६ मे २०२३ ला ठेकेदार नियुक्त करून कामाला सुरूवात झाली आहे. चोकाक ते सांगली फाटा हा ७ कि.मी.चा रस्ता याच राष्ट्रीय भाग असणार आहे. शिये फाटा ते चोकाक हा मार्ग थेट राष्ट्रीय मार्गाला जोडला गेल्याने पुणे- मुंबईकडून आलेली वाहतूक शहराबाहेरून वळविणेत आल्याने वाहतूकीला शिस्त लागणार आहे.