ताजी बातमी ऑनलाईन टीम
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे आज कोल्हापूर दौऱ्यावर असून दसरा चौकात आज त्यांच्या जाहीर सभेचे आयोजन जिल्हा राष्ट्रवादी पक्षाकडून केले आहे. शरद पवार कोल्हापूरात येत आहेत आणि त्यांची आणि आपली भेट होऊ शकणार नाही असे सांगत असतानाच राष्ट्रवादीचे बंडखोर आमदार आणि राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या डोळ्यांमध्ये आले अश्रू तरळले.
आज माध्यमांशी कोल्हापूरात बोलताना मंत्री हसन मुश्रीफ यांना शरद पवार यांच्या कोल्हापूर दौऱ्यावर प्रतिक्रीया विचारली असता ते म्हणाले, “40 वर्षानंतर प्रथमच कोल्हापुरात शरद पवार येऊन देखील आमची भेट होणार नाही. परिस्थितीप्रमाणे आम्ही निर्णय घेतलेला आहे. का निर्णय घ्यावा लागला याचे विवेचनही आम्ही केलेले आहे. आज ते येत आहेत मात्र मी त्यांच्यासोबत नाही.” असे ते सांगत असताना भावनाविवश होऊन त्यांच्या डोळ्यात अश्रु तरळले.
पुढे बोलताना ते म्हणाले, “काही निर्णय आम्ही घेतले असली तरी पवार साहेबांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली आम्ही एनडीए मध्ये आहे हेच खरे आहे.” असेही ते म्हणाले.
हसन मुश्रीफ यांच्या डोळ्यात अश्रु ! 40 वर्षात पहील्यांदाच साहेबांची भेट होणार नसल्याने भावनाविवश
RELATED ARTICLES
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -