ताजी बातमी ऑनलाईन टीम
राष्ट्रवादीत कोणतीही फूट पडलेली नाही, अजित पवार हे आमचेच नेते आहेत, या सुप्रिया सुळेंच्या वक्तव्याला शरद पवारांनी दुजोरा दिला होता. मात्र, आता पवारांनी या वक्तव्यावरुन यू-टर्न घेतला आहे. राष्ट्रवादीमध्ये फूट पडली नाही. काही लोकांनी पक्षविरोधी भूमिका घेतली आहे. अजित पवार आमचे नेते आहेत असं मी म्हणालोच नाही. पहाटेच्या शपथविधीनंतर अजित पवार यांना संधी दिली होती, आता त्यांना पुन्हा संधी देणार नसल्याचे शरद पवार यांनी स्पष्ट केले.
दहिवडी येथे एका सभेदरम्यान शरद पवार म्हणाले, अजित पवार आपले आहेत, याचा राजकीय अर्थ काढू नका. सुप्रिया आणि अजित भाऊ-बहिण या हेतूने ते विधान होतं. आमच्यातल्या काही लोकांनी वेगळी भूमिका घेतली. पहाटेच्या शपथविधीनंतर अजित पवारांना संधी दिली होती. आता संधी द्यायची नसते आणि मागायचीही नसते, अशा शब्दात त्यांनी अजित पवारांना खडसावले.
काय म्हणाले होते शरद पवार?
अजित पवार आमचेच आहेत. त्याबद्दल वादच नाही. पक्षातील काही लोकांनी वेगळा निर्णय घेतला म्हणजे पक्ष फुटला असे होत नाही. जर पक्षातून एक मोठा वर्ग वेगळा झाला आणि त्यांनी पक्ष सोडला तर पक्ष फुटला असं म्हणता येईल. या या ठिकाणी अशी परिस्थिती नाही. काहींनी वेगळी भूमिका घेतली आहे तो त्यांचा अधिकार आहे. वेगळा निर्णय घेतला म्हणून फूट म्हणण्याचं काही कारण नाही, असे पवारांनी म्हटले होते.
‘मी तसं म्हणालोच नाही’, अजित पवारांबाबतच्या वक्तव्यावर शरद पवारांचा यू-टर्न
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -