ताजी बातमी ऑनलाईन टीम
बाॅलिवूड अभिनेता शाहरुख खान हा नेहमीच चर्चेत असणारा अभिनेता आहे. शाहरुख खान याच्या चाहत्यांमध्ये सध्या मोठा उत्साह हा बघायला मिळतोय. कारण यंदा शाहरुख खान याचे एका मागून एक असे चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. विशेष म्हणजे यंदाच शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान आणि मुलगी सुहाना खान हे देखील बाॅलिवूडमध्ये पर्दापण करणार आहेत. शाहरुख खान याचा काही दिवसांपूर्वीच पठान हा चित्रपट रिलीज झाला. विशेष म्हणजे शाहरुख खान याच्या या चित्रपटाने मोठा धमाका केला.
शाहरुख खान हा सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या आगामी जवान हा चित्रपटाचे प्रमोशन करत आहे. विशेष म्हणजे शाहरुख खान याने चाहत्यांसाठी एका सेशनचे आयोजन हे केले होते. या सेशनमध्ये शाहरुख खान हा आपल्या चाहत्यांच्या प्रश्नाला उत्तरे देताना दिसला. शाहरुख खान याने पठाण चित्रपटाचे देखील अशाच प्रकारे प्रमोशन हे केले होते.
आता शाहरुख खान याच्याबद्दल एक अत्यंत मोठी बातमी ही पुढे येतंय. शाहरुख खान याच्या मन्नत बंगल्याबाहेर पोलिसांनी मोठा बंदोबस्त वाढवला आहे. अनटच इंडिया फाउंडेशनचे म्हणणे आहे की, शाहरुख खान हा ऑनलाइन जुगाराला प्रोत्साहन देत आहे. अनटच इंडिया फाउंडेशनच्या वतीने शाहरुख खान याच्या मन्नत बंगल्याबाहेर आंदोलन केले जाणार होते.
इतकेच नाही तर या संघटनेचे काही लोक शाहरुख खान याच्या मुंबईतील मन्नत बंगल्याबाहेरही पोहचले होते. मात्र, याची कल्पना ही पोलिसांना लागताच त्यांनी शाहरुख खानच्या घराबाहेरील बंदोबस्त वाढवला. पोलिसांनी या प्रकरणात काही लोकांना ताब्यात देखील घेतले आहे. परिस्थिती चिघळण्याची शक्यता असल्याने.
अजूनही शाहरुख खान याच्या बंगल्याबाहेर मोठा पोलिस बंदोबस्त हा दिसत आहे. शाहरुख खान याने काही वेळापूर्वी सोशल मीडियावर सेशनचे आयोजन केले होते. मात्र, याबद्दल काहीच बोलताना शाहरुख खान हा दिसला नाही. शाहरुख खान याच्या घराबाहेर अचानक पोलिस बंदोबस्त वाढल्याने चर्चांना उधाण आले होते.
शाहरुख खान याचा जवान हा चित्रपट 7 सप्टेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना शाहरुख खान हा दिसत आहे. विशेष म्हणजे शाहरुख खान याच्या या चित्रपटाबद्दल चाहत्यांमध्ये मोठी क्रेझ ही बघायला मिळत आहे. आता शाहरुख खान याचा हा चित्रपट बाॅक्स आॅफिसवर काय धमाका करतो हे पाहण्यासारखे ठरणार आहे.
मुंबई पोलिसांनी वाढवली शाहरुख खान याच्या बंगल्याबाहेरील सुरक्षा, अखेर कारण आले समोर
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -