महाराष्ट्र शासनाने जिल्हा परिषदांमध्ये शिपाई, आरोग्यसेवक व अन्य पदांची भरती प्रक्रिया राबविली असली तरी अवाजवी प्रवेश अर्ज फी लादली गेल्यामुळे ग्रामीण भागातील हजारो सर्वसामान्य विद्यार्थ्यांना या नोकरभरती पासून वंचित राहावे लागल्याची परिस्थिती आहे. यामुळे दुःख झाल्याची भावना शिवाजी विद्यापीठ विद्यार्थी संघटनेचे (यूएसए) कोल्हापूर जिल्हा कार्याध्यक्ष गोरक्ष सकटे यांनी दै. पुढारीशी बोलताना व्यक्त केली आहे. गोरंगरिबांची मुले हक्काच्या नोकरी पासून वंचित राहणार असतील तर शासनाने अनाठायी फी बाबत फेरविचार करायला हवा, अशी संघटनेची मागणी असल्याचेही त्यांनी सांगितले.नोकरभरतीच्या पहिल्याच टप्प्यात झालेल्या या अन्यायाबाबत विद्यार्थ्यांमध्ये मोठा असंतोष असून शासनाला जाब विचारण्यासाठी ‘यूएसए’ नक्कीच पुढाकार घेणार आहे. यासाठी विद्यार्थ्यांच्यात जागृतीची मोहीम सुरू केली आहे. या विद्यार्थी लढ्याला प्रसार माध्यमांनी बळ द्यावे, असे आवाहनही सकटे यांनी केले आहे.
सकटे पुढे म्हणाले, महाराष्ट्र राज्य शासना अंतर्गत सर्व जिल्हा परिषदांमध्ये एकाचवेळी विविध पदांची मोठी पदसंख्या भरती (Recruitment) करण्यात येत आहे. याची ऑनलाइन प्रवेश अर्ज प्रक्रिया शुक्रवारी (दि. २५) समाप्त झाली. मात्र, प्रवेश अर्जाचे शुल्क १ हजार रुपये भरणे अनिवार्य केल्यामुळे शेतकरी, कष्टकरी, मजूर अशा रोजीरोटीसाठी झगडणाऱ्या अनेक सर्वसामान्यांची मुले हे अवास्तव शुल्क भरणार कुठून ? साहजिकच पैशाअभावी प्रवेश अर्जच भरू न शकलेली संबंधित मुले शासनाच्या भरती प्रक्रियेतून बाहेर पडल्याचे वास्तव क्लेशदायक आहे. शासनाने याचा पुनर्विचार करावा, असे ते म्हणाले.
दरम्यान, कोल्हापूर जिल्ह्यातून तलाठी भरतीत उतरलेल्या विद्यार्थ्यांनी प्रवेशअर्जात कोल्हापूर, सांगली, पुणे या परिक्षाकेंद्रांना पसंतीक्रम दिला असताना अनेक परीक्षार्थींना छत्रपती संभाजीनगर हे परीक्षाकेंद्र कसे काय देण्यात आले? शासनाकडूनच विद्यार्थ्यांची सतत होणारी फसवणूक थांबणार तरी कधी? असे सवाल उपस्थित करून या अन्यायाविरुद्ध यूएसए तीव्र लढा उभारणार असल्याचा इशारा कार्याध्यक्ष गोरक्ष सकटे यांनी दै. पुढारीशी बोलताना दिला आहे.
जिल्हा परिषदेच्या नोकर भरतीला मुकणार हजारो मुले!
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -