Thursday, November 21, 2024
Homeब्रेकिंगयंत्रमागधारकांचे वीजबिल होणार माफ!

यंत्रमागधारकांचे वीजबिल होणार माफ!

सध्या कर्नाटक राज्यात विविध हमी योजनांची अंमलबजावणी सुरु आहे. गृहज्योती योजनेंतर्गत २०० युनिटपर्यंत वीज वापरणाऱ्या ग्राहकांचे वीजबिल माफ करण्यात येत आहे. यापुढे दहा अश्वशक्ती पयत वीजजोडणी असणाऱ्या राज्यातील यंत्रमाग व्यावसायिकांनाही मोफत विजेचे गिफ्ट मिळणार आहे. दहा अश्वशक्तीपर्यंत वीजजोडणी असणाऱ्या राज्यातील यंत्रमाग कारखानदारांचे वीजबिल माफ करण्यात येणार आहे. येत्या ऑक्टोबरपासून या सवलतीचा लाभ राज्यातील विणकर व्यावसायिकांना मिळण्याची शक्यता आहे. 

शुक्रवारी विणकरव्यावसायिकांच्या  शिष्टमंडळाने मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांची भेट घेऊन चर्चा केली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी हा महत्त्वाचा निर्णय जाहीर केला. बैठकीत मुख्यमंत्र्यांचे राजकीय सचिव नसीर अहमद, हातमाग आणि वस्त्रोद्योग खात्याचे आयुक्त गौरव गुप्ता, अर्थ खात्याचे अपर मुख्य सचिव एल. के.अतिक, मुख्यमंत्र्यांचे सचिव जयराम, वस्त्रोद्योग खात्याचे सचिव पी. एस. एन. कुमार यांच्यासह विणकरांच्या शिष्टमंडळातील हेमंतराजू, पी. के. गोपाल, अमरनाथ, आर. राजू आदी उपस्थित होते.

काँग्रेसने निवडणुकीवेळी आपल्या विधानसभा घोषणापत्रात १० अश्वशक्तीपर्यंत वीजजोडणी असणाऱ्या राज्यातील विणकर व्यावसायिकांची वीजबिले माफ करण्याची
यंत्रमागधारकांचे वीजबिल माफ हमी दिली होती. काही दिवसांपूर्वी राज्यातील विविध विणकर संघटनांनी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांची बंगळूर येथे भेट घेऊन १० अश्वशक्तीपर्यंत वीजजोडणी असणाऱ्या यंत्रमाग व्यावसायिकांचे वीजबिल माफ करण्यात यावे, अशी मागणी केली होती. याबरोबरच विणकर विशेष योजनेंतर्गत २० अश्वशक्तीपर्यंतच्या वीजजोडणीसाठी प्रति युनिट १ रुपये २५ पैसे हा दर आकारण्यात येणार आहे. यामुळे यंत्रमाग व्यावसायिकांतून समाधान व्यक्त होत आहे. ऑक्टोबरपासून या निर्णयाची अंमलबजावणी होण्याची शक्यता आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -