Tuesday, December 24, 2024
Homeब्रेकिंगअखेर शिक्षक भरतीची तारीख फायनल! बिंदुनामावली अंतिम ५ सप्टेंबरपूर्वी उघडणार पवित्र पोर्टल;...

अखेर शिक्षक भरतीची तारीख फायनल! बिंदुनामावली अंतिम ५ सप्टेंबरपूर्वी उघडणार पवित्र पोर्टल; पण ‘इतक्याच’ जागांची भरती

दहा जिल्हा परिषदांच्या शिक्षक विभागाची बिंदुनामावली अंतिम झाली असून उर्वरित जिल्हा परिषदांना बिंदुनामावली तत्काळ मागासवर्गीय कक्षाला पाठविण्याचे आदेश शिक्षण आयुक्तांनी दिले आहेत.त्यामुळे सहा वर्षांच्या भरतीची प्रतीक्षा आता संपणार असून ५ सप्टेंबरपूर्वी राज्यातील शिक्षक भरतीचे ‘पवित्र’ पोर्टल उघडले जाणार आहे.

राज्यातील जिल्हा परिषदांसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा व खासगी अनुदानित शाळांमध्ये जवळपास ६२ हजार शिक्षकांची पदे रिक्त आहेत. त्यातील ५० टक्के पदांची भरती पवित्र पोर्टलद्वारे शासन स्तरावरून भरली जाणार आहेत.

स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांना पसंतीक्रमानुसार जिल्ह्यांची निवड करावी लागणार आहे. सुरवातीला प्रोफाईल तयार करून घ्यावे लागेल. गुणवत्ता यादीनुसार त्यांना त्या जिल्हा परिषद शाळांमध्ये नोकरीची संधी मिळणार आहे. दुसरीकडे खासगी अनुदानित संस्थांना रिक्तपदांची जाहिरात ‘पवित्र’वर अपलोड करावी लागणार आहे. त्यानंतर एका जागेसाठी तीन उमेदवार त्या खासगी संस्थेत पाठविले जातील. त्यांची निवड मुलाखतीतून होणार आहे.आता तातडीने बिंदुनामावली अंतिम करून मागासवर्गीय कक्षाकडून अंतिम करून घेतली जात आहे. पाच-सहा दिवसांत ही कार्यवाही पूर्ण झाल्यावर पवित्र पोर्टल सुरू होईल, अशी माहिती शिक्षण आयुक्तालयातील सूत्रांनी ‘सकाळ’शी बोलताना दिली.

अंदाजे २३ हजार जागांची भरती

राज्यात मागे २०१७मध्ये शिक्षक भरती झाली होती, त्यानंतर टीईटी, टेट होऊनही भरती झाली नाही. विद्यमान शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांनी जिल्हा परिषदांमधील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे, खासगी अनुदानित शाळांमधील विद्यार्थ्यांचेही शिक्षकांअभावी हाल होवू नये या हेतूने शिक्षक भरतीची घोषणा केली. त्यानुसार युद्धपातळीवर कार्यवाही सुरु आहे. नुकत्याच झालेल्या संचमान्यतेनुसार राज्यात पहिल्या टप्प्यात साधारणत: २३ हजार शिक्षकांची भरती होणार आहे. त्यात स्थानिक स्वराज्य संस्थांसह खासगी अनुदानित शाळांमधील रिक्तपदांचाही समावेश आहे.सोलापूर झेडपीला मिळणार ६९१ शिक्षक

सोलापूर जिल्हा परिषदेच्या दोन हजार ७९५ शाळा असून त्याअंतर्गत जवळपास दोन लाख विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाची बिंदुनामावली अंतिम झाली असून सामाजिक संघटनांच्या प्रतिनिधींशी चर्चा केल्यानंतर आता बिंदुनामावली अंतिम मान्यतेसाठी मागासवर्गीय कक्षाला सादर केली जाणार आहे. संचमान्यता व बिंदुनामावलीनुसार होणाऱ्या शिक्षक भरतीतून सोलापूर जिल्हा परिषदांच्या शाळांना ६९१ शिक्षक मिळतील, असे वरिष्ठ सूत्रांनी सांगितले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -