Monday, December 23, 2024
Homeमनोरंजनशाहरुखचा ‘जवान’ हा चित्रपट जगातील सर्वात मोठ्या सिनेमागृहात प्रदर्शित होणार

शाहरुखचा ‘जवान’ हा चित्रपट जगातील सर्वात मोठ्या सिनेमागृहात प्रदर्शित होणार

बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान सध्या ‘जवान’ या सिनेमामुळे चर्चेत आहे. ‘पठाण’नंतर ‘जवान’ हा सिनेमा जगभरातील सिनेमागृहात धमाका करण्यासाठी सज्ज आहे. ‘जवान’ हा सिनेमा जगातील सर्वात मोठ्या स्क्रीनवर रिलीज होणारा पहिला भारतीय सिनेमा ठरला आहे. त्यामुळे किंग खान इतिहास रचण्यासाठी सज्ज आहे.

शाहरुखचा ‘जवान’ हा सिनेमा जर्मनी येथील लियोनवर्ग येथील मोठ्या सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. आयमॅक्स स्क्रीन ट्रम्पलास्टवर हा सिनेमा प्रदर्शित करण्यात येईल. IMAX स्क्रीन 125 फूट रुंद आणि 72 फूट उंच आहे. या स्क्रीनवर प्रदर्शित होणारा ‘जवान’ हा पहिलाच भारतीय सिनेमा असणार आहे.

शाहरुखचा ‘जवान’ हा सिनेमा 407 स्क्रीन्सवर रिलीज होणार आहे. 7 सप्टेंबर 2023 रोजी हा सिनेमा जगभरातील सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. दाक्षिणात्य सिनेमांचे लोकप्रिय दिग्दर्शक एटली यांनी या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. या सिनेमात किंग खानसह नयनतारा, सान्या मल्होत्रा मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. तसेच बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोणची झलक या सिनेमात पाहायला मिळणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -