येथील राम मंदिर चौकातील दिलीप मनोहर काळे यांचा फ्लॅट चोरट्यांनी भरदिवसा फोडला. सोन्याचे दागिने व तीन लाखांची रोकड असा एकूण आठ लाखांचा ऐवज लंपास केला.रविवारी दुपारी ही घटना घडली.घटनेची रात्री उशिरा शहर पोलिस ठाण्यात नोंद झाली. दिलीप काळे प्रणाम आर्केटमधील फ्लॅट क्रमांक दोनमध्ये राहतात. ते नरदे (ता. हातकणंगले) येथे सब रजिस्टर आहेत. रविवारी सकाळी ते कुटुंबासह परगावी गेले होते. दरम्यानच्या काळात चोरट्यांनी त्यांच्या बंद फ्लॅटच्या दरवाजाचे कुलूप बनावट चावीने उघडून आत प्रवेश केला. बेडरूमधील लाकडी कपाट उघडून त्यामधील साहित्य विस्कटले. लॉकरमधील सात तोळ्याचे सोन्याचे गंठण, पाच तोळ्याचा कोल्हापुरी साज, दोन तोळ्याचा नेकलेस व तीन लाखांची रोकड असा एकूण आठ लाख रुपयांचा ऐवज घेऊन चोरटे पसार झाले.
काळे कुटुंब दुपारी परगावाहून परतले. त्यावेळी चोरीचा प्रकार उघडकीस आला. पोलिस उपअधीक्षक अण्णासाहेब जाधव, निरीक्षक अभिजित देशमुख यांच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
चोरट्यांचा माग काढण्यासाठी श्वानपथक व ठसे तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले. श्वान अपार्टमेंटपासून काही अंतरावर जाऊन घुटमळले. तज्ज्ञांना महत्त्वाचे ठसे मिळाले आहेत. यावरून पुढीला तपासाला दिशा देण्यात आली आहे. सायंकाळी पंचनामा झाल्यानंतर काळे यांची फिर्यादघेऊन गुन्हा दाखल करण्यात आला. स्थानिक गुन्हेगारांनी पाळत ठेऊन चोरी केली असण्याची शक्यता आहे. रेकॉर्डवरील गुन्हेगारांना ताब्यात घेऊन चौकशी केली जात आहे. परिसरातील सीसीटीव्ही कॅमेर्याचे फुटेज तपासले जात आहे. अपार्टमेंटमधील रहिवाशांकडे चौकशी केली जात आहे.
सांगली : भरदिवसा फ्लॅट फोडला
RELATED ARTICLES
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -