Sunday, December 22, 2024
Homeक्रीडाकानामागून आला अन् विकेट झाला, हार्दिक पांड्याचं शतक हुकलं

कानामागून आला अन् विकेट झाला, हार्दिक पांड्याचं शतक हुकलं

ताजी बातमी ऑनलाईन टीम

टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय भारताने पाकिस्तानसमोर 267 धावांचं आव्हान ठेवलं आहे. भारताकडून ईशान किशनने 82 धावांची झुंजार खेळी केली तर टीम इंडियाचा उपकर्णधार हार्दिक पांड्या 87 धावा करत संकटमोचक ठरला. दुसरीकडे पाकिस्तानच्या शाहीन आफ्रिदीने 4 विकेट घेतल्या. तर नसीम शाह आणि हॅरिस रौफने 3-3 विकेट घेतल्या.

पारंपारिक प्रतिस्पर्धी असलेल्या भारत आणि पाकिस्तान यांच्यात आशिया चषकातील तिसरा सामना खेळवला जाणार आहे. शनिवारी कँडी येथील पल्लेकेले इंटरनॅशनल स्टेडियमवर हा सामना पार पडले. एकीकडे फॉर्ममध्ये असलेल्या बाबर आझम तर दुसरीकडे टीम इंडियाची शान विराट कोहली . त्यामुळे आता या सामन्यात कोण बाजी मारणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय.

छोटा पॅकेट बडा धमाका! ईशान किशनने राखली टीम इंडियाची लाज…. पाकिस्तानविरुद्ध इशान किशनने 82 धावांची झुंजार खेळी केली. हॅरिस रौफने इशानची विकेट घेतली.

टीम इंडियाचा उपकर्णधार हार्दिक पांड्याने संयमी खेळी करत इशान किशनला मोलाची साथ दिली आहे. हार्दिकने देखील 62 ब़ॉलमध्ये अर्धशतक पूर्ण केलं.

शाहीन आफ्रिदीच्या स्पीडपुढे शुभमन गिलचा टीकाव लागला नाही. गिलने 32 बॉलमध्ये फक्त 10 धावा केल्या. नसीम शाहच्या घातक गोलंदाजीसमोर शुभमनचा निकाल लागला नाही. त्यानंतर आता शाहीनने गिलचा विषय संपवला. त्यामुळे आता टीम इंडिया संकटात सापडल्याचं समोर आलंय.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -