ताजी बातमी ऑनलाईन टीम
जालन्यात मराठा आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केल्यानंतर राज्यातील वातावरण चांगलंच तापलं आहे. विरोधकांनी सरकारला धारेवर धरलं असून, जाब मागितला आहे. तसंच जालन्यात जाऊन परिस्थितीचा आढावा घेत जखमींची भेट घेत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी जालन्याचा दौरा करत जखमींची भेट घेतली आहे. या भेटीनंतर पत्रकार परिषदेत बोलताना शरद पवार यांनी सरकारवर जोरदार टीका केली. जालन्यात घडलेला प्रकार गंभीर असून, त्याची दखल घेतली नाही तर हा प्रकार जिल्ह्यापुरता मर्यादित राहणार नाही. संपूर्ण महाराष्ट्रात हे लोण पसरेल अशी भीती असल्याने आम्ही आलो असं शरद पवारांनी सांगितलं.
मराठवाड्याचा मोठा दौरा आयोजित करण्याच्या प्रयत्नात होतो. कारण यावेळी पाऊस कमी झाला आहे. सर्व जलाशयांची स्थिती चिंताजनक आहे. आता त्यासाठी वेगळा कार्यक्रम घेऊ,” अशी माहिती शरद पवारांनी माहिती दिली.
मुंबईतून सूचना आली अन्…’, शरद पवारांचा गंभीर आरोप; ‘तो सरकारमधील शक्तिशाली व्यक्ती’
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -