ताजी बातमी ऑनलाईन टीम
ड्रीम गर्ल 2 हा आयुष्मान खुराना याचा चित्रपट धमाका करताना दिसत आहे. ड्रीम गर्ल 2 या चित्रपटात आयुष्मान खुराना याच्यासोबत अनन्या पांडे ही देखील मुख्य भूमिकेत आहे.
गदर 2 समोर अजूनही ड्रीम गर्ल 2 हा चित्रपट टिकून आहे. लवकरच आता ड्रीम गर्ल 2 हा चित्रपट 100 कोटींचे क्लबमध्ये सहभागी होणार आहे
ड्रीम गर्ल 2 चित्रपटाने आतापर्यंत 77.70 कोटींचे कलेक्शन केले आहे. चित्रपटाने आठव्या दिवशी 4.7 कोटींचे कलेक्शन केले आहे.
अजून पुढील काही दिवस चित्रपट धमाका करेल असे सांगितले जात आहे. चित्रपटाकडून मोठ्या अपेक्षा निर्मात्यांनी नक्कीच आहेत.
आयुष्मान खुराना याच्या अभिनयाचे काैतुक सर्वत्र केले जात आहे. अनन्या पांडे हिला आपल्या अभिनयाची छाप सोडण्यात यश मिळाले नाही.