Saturday, December 21, 2024
Homeब्रेकिंगमहिलांसाठी सरकारची खास योजना काय आहे पात्रता आणि कसा करायचा अर्ज ?

महिलांसाठी सरकारची खास योजना काय आहे पात्रता आणि कसा करायचा अर्ज ?

आपल्या देशात पुरुषांप्रमाणे महिलांचा देखील समान वाटा आहे. पुरुष असू वा महिला प्रत्येकाने स्वावलंबी असणं महत्वाचं आहे. एखादा माणूस जेव्हा इतरांवर अवलंबून न राहता स्वतःची जबाबदारी घ्यायला सक्षम बनतो तेव्हा अपोआपच त्याचा आत्मविश्वास वाढायला मदत होते. देशात अश्या अनेक महिला आहेत ज्या पूर्णवेळ गृहिणी म्हणून घराची जबाबदारी पार पडत असतात. गावातील महिलांवर शिक्षणाच्या अभावी इच्छा असून देखील काम करण्याची संधी मिळत नाही. जर का देशाची प्रगती करायची असेल तर या सर्व बेरोजगार आणि इच्छुक महिलांना काम मिळणं गरजेचं आहे.

महिलांच्या सक्षमीकरणासाठी केंद्र सरकार सातत्याने प्रयत्नशील असून वेगवेगळ्या योजना राबवत असते. अशीच एक योजना सरकारने देशातील अल्पसंख्यांक महिलांसाठी आणली आहे. प्रधानमंत्री नयी रोशनी योजना या या योजनेचं नाव असून या योजनेच्या माध्यमातून महिलांना नेमका कसा फायदा घेता येतो हेच आज आपण जाणून घेऊयात.

काय आहे नयी रोशनी योजना? PM Nai Roshni Yojana
वर्ष 2013 मध्ये केंद्र सरकार कडून PM Nai Roshni Yojana सुरु करण्यात आली. ही योजना अल्पसंख्यांक महिलांना रोजगार मिळवून देण्याचं काम करते. गरीबी आणि बेरोजगारी यामुळे पिडीत महिलांची मदत करण्यासाठी या योजेची सुरुवात करण्यात आली आहे. ह्याचा प्रमुख उद्देश महिलांना सशक्त बनवणे असा आहे, महिलांच्या मनात स्वतः बद्दल विश्वास निर्माण व्हावा म्हणून ही योजना राबवली जाते. एवढंच नाही तर या योजनेच्या माध्यमातून महिलांना सरकारी कामे, बँकची कामे, technical गोष्टी हाताळणे इत्यादी कामं करता यावी याचं प्रशिक्षणही दिलं जातं. मागासलेल्या महिला वर्गाला त्याच्या गुणांचा फायदा करून देत त्यांची परिस्थिती सुधारण्याची ही योजना आहे. यासाठीच्या अधिक माहितीसाठी तुम्ही http://nairoshni-moma.gov.in या अधिकृत website ला भेट देऊ शकता.PM Nai Roshni Yojana अंतर्गत हे उपक्रम राबवले जातात:
PM Nai Roshni Yojana याच्या अंतर्गत महिलांना सुशिक्षित बनवलं जातं, त्यानां स्वच्छता आणि आर्थिक गोष्टीबदल शिकवलं जातं. महिलांसाठी सरकारी योजना काय आहेत, सरकारी नियम व कायदे कोणते आहेत याबद्दल माहिती दिली जाते. व्यावहारिक व Digital गोष्टी शिकवल्या जातात. या योजनेअंतर्गत एका गावातून एका Batch साठी 25 महिलांना प्रशिक्षणासाठी निवडलं जातं. यातील 10% महिलांनी दहावी उत्तीर्ण असणं महत्वाचं आहे. मागच्या तीन वर्षात या योजनेतून एक लाख महिलांना प्रशिक्षण देण्यात आलं आहे.

काय आहे पात्रता ?
या योजनेमध्ये 18 ते 65 वर्षीय अल्पसंख्याक महिला भाग घेऊ शकतात. या महिलांनी भारतीय असणं गरजेचं आहे. ज्या महिला अल्पसंख्यांक गटात आहेत केवळ त्यानांच या गटाचा भाग बनता येईल.


Online Registration कसं कराल?
PM Nai Roshni Yojana मध्ये नाव नोंदवण्यासाठी सर्वात आधी तुम्हाला Ministry Of Minority Affairs Government Of India ला भेट द्यावी लागेल. इथे तुम्हाला New Registration असा एक option दिसेल तिथे जाऊन सर्व माहिती देत तुम्ही नाव नोंदवू शकता.

आवश्यक कागदपत्रे?
आधार कार्ड
10 /12 वी मार्कशीट
बँक अकाउंट डिटेल्स
रहिवाशी दाखला
पासपोर्ट आकाराचा फोटो
मोबाईल नंबर
ई- मेल आयडी

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -