Monday, October 7, 2024
Homeसांगलीसांगली: जगण्याचा कंटाळा आल्याचा संदेश देत तरुणाची आत्महत्या

सांगली: जगण्याचा कंटाळा आल्याचा संदेश देत तरुणाची आत्महत्या

मला जगण्याचा कंटाळा आला असल्याची चिठ्ठी लिहून चिठ्ठीचा संदेश समाज माध्यमावर प्रसारित करीत जत तालुक्यात एका तरूणांने गळफास लावून आत्महत्या केल्याचा प्रकार शनिवारी सकाळी उघडकीस आला.जतपासून शेगाव रस्त्यावरील माने वस्तीवर ही घटना घडली.मानेवस्तीवरील भिमु पांडूरंग माने (वय ३०) याने घराजवळ असलेल्या झाडाला रात्री गळफास लावून घेतली असल्याचे शनिवारी सकाळी निदर्शनास आले.

तत्पुर्वी त्यांने चिठ्ठी लिहून आपणास जगण्याचाच कंटाळा आला आहे. आपल्या मृत्यूबद्दल आई-वडिलांना कोणताही त्रास देऊ नये अशी चिठ्ठी त्यांने मद्याच्या अंमलाखाली असताना लिहीली असल्याचे सांगण्यात आले. या चिठ्ठीचे छायाचित्र त्यांने निकटचे नातलग व स्नेह्यांना समाज माध्यमावर पाठविले होते. मृत माने हा अविवाहित होता. तर तो चालक म्हणून काम करीत होता. या प्रकरणी जत पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -