जिल्ह्यातून होणार्या निर्यातीत (export) यावर्षी 17.13 टक्क्यांनी वाढ झाली आहे. गतवर्षी 7 हजार 763 कोटींची निर्यात झाली होती. मात्र, एप्रिल 2022 ते मार्च 2023 या आर्थिक वर्षात जिल्ह्यातून 9 हजार 368 कोटींची निर्यात झाली आहे. केंद्र शासनाच्या वाणिज्य आणि उद्योग विभागाच्या ‘डीजीसीआयएस’च्या अहवालात ही माहिती देण्यात आली आहे. एक जिल्हा एक उत्पादनांतर्गतही 2021-22 या वर्षी 107 कोटी 95 लाखांची निर्यात झाली आहे. कृषी, औद्योगिक क्षेत्रातील राज्यातील प्रमुख जिल्ह्यांपैकी एक अशी कोल्हापूरची ओळख आहे. कोल्हापुरातून होणार्या निर्यातीत सातत्याने होणारी वाढ, ही उद्यमशील कोल्हापूरची ओळख आणखी द़ृढ करणारी ठरत आहे. साखर, कापड, वाहनांचे सुटे भाग याबरोबर न्यूक्लीअर रिअॅक्टरचीही जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात निर्यात होत आहे. यासह लोखंड आणि स्टील तसेच मासेही मोठ्या प्रमाणात निर्यात होत आहेत.
कोल्हापूरसाठी अमेरिका सर्वात मोठी बाजारपेठ
अमेरिका हा देश कोल्हापूरसाठी सर्वात मोठी बाजारपेठ आहे. कोल्हापुरातून अमेरिकेसाठी सर्वाधिक निर्यात होत आहे. त्याखालोखाल इंडोनेशिया, बांगला देश, संयुक्त अरब अमिरात यांचा क्रमांक लागतो. चीन, इटली, सौदी अरेबिया, कोरिया रिपब्लिक, जर्मनी, मलेशिया या देशांतही कोल्हापुरातून निर्यात होत आहे.
साखरेची 3 हजार 532 कोटींची निर्यात
जिल्ह्यातून यावर्षी सर्वाधिक निर्यात (export) साखरेची झाली आहे. गेल्या आर्थिक वर्षात तीन हजार 532 कोटींची साखर निर्यात करण्यात आली आहे. त्याखालोखाल टेक्स्टाईलची निर्यात झाली आहे. वर्षभरात सुमारे एक हजार 760 कोटींची निर्यात झाली आहे.
‘एक जिल्हा – एक उत्पादन’लाही मागणी
‘एक जिल्हा – एक उत्पादन’अंतर्गत कोल्हापुरी गूळ आणि फौंड्री तसेच जीआयअंतर्गत कोल्हापुरी गूळ, चप्पल, आजरा घनसाळ तांदूळ याला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. यामुळे त्यांचीही निर्यात होत असते.
कोल्हापूर-वैभववाडी मार्गाला गती देण्याची गरज
कोल्हापूर-वैभववाडी रेल्वेमार्ग प्रस्तावित आहे. हा मार्ग अस्तित्वात आल्यानंतर कोल्हापूर थेट जयगड बंदराशी जोडले जाऊ शकते. यामुळे मालवाहतूक विशेषत: निर्यात होणार्या उत्पादनांच्या वाहतुकीसाठी हा मार्ग अत्यंत सोयीचा ठरू शकतो. यामुळे या मार्गाला गती देण्याची गरज आहे.
गूळ, चप्पल, आजरा घनसाळच्या बाजारपेठा
कोल्हापूर गूळ, चप्पल तसेच आजरा घनसाळ तांदळाच्या ऑस्ट्रेलिया, कॅनडा, जर्मनी, कतार, इंग्लड, अमेरिका, बांगला देश, संयुक्त अरब अमिरात या बाजारपेठा आहेत. कोल्हापूरच्या या उत्पादनासाठी सोमानिया, श्रीलंका, टांझानिया, येमेन, इराक, मलेशिया, सौदी अरेबिया, सिंगापूर आणि थायलंड या देशांत निर्यातीसाठी संधी आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातून यावर्षी कोटींची निर्यात
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -