Sunday, September 8, 2024
Homeब्रेकिंगCM शिंदेंच्या उपस्थितीत मराठा आरक्षणाबाबत आज महत्वाची बैठक; काय होणार निर्णय?

CM शिंदेंच्या उपस्थितीत मराठा आरक्षणाबाबत आज महत्वाची बैठक; काय होणार निर्णय?

राज्यात पुन्हा एकदा मराठा आरक्षणाचा मुद्दा तापला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी आंदोलनाला हिंसक वळण लागले आणि ते सोलापूर, औरंगाबाद, नागपूर आणि महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांमध्ये पसरले. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आज एक महत्वाची बैठक पार पडणार आहे.

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा आरक्षणाबाबत एक निवेदन जारी केले आहे. या निवेदनात मराठा आरक्षणाबाबत महाराष्ट्र मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक ४ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजता होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

मुख्यमंत्री शिंदेंच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह होणाऱ्या या बेठकील . मराठा आरक्षण मंत्री उपसमितीमधील सर्व सदस्य मंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवारही उपस्थित रहाणार.

तसेच या बैठकीत मराठवाडा विभागीय आयुक्त, छत्रपती संभाजी नगर, हिंगोली, परभणी, अहमद नगर, जालना, नांदेड, लातूर, या जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक असे सर्व वरिष्ठ प्रशासकिय अधिकारी देखील सहभागी होणार आहेत.

मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसलेल्या मनोज जरंगे पाटील यांना देखील महाराष्ट्र सरकारने निमंत्रण दिले आहे. सरकारी सूत्रांनी रविवारी ही माहिती दिली. मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीबाबत सरकारी अधिकारी आणि जरंगे पाटील यांच्यात बैठक होणार असल्याचे सूत्राने सांगितले.

जरंगे हे मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी ते उपोषणाला बसले होते. अधिकाऱ्यांनी त्याना रुग्णालयात हलवण्याचा प्रयत्न केल्यानंतर शुक्रवारी आंदोलनाला हिंसक वळण लागले. यावेळ पोलिसांनी आंदोलकांवर लाठीमार केल्याचा प्रकार घडल्याचे पडसाद राज्यभर उमटत आहेत.

राज्यभरात अनेक ठिकाणी मराठा समाजाकडून रास्तोरोको आंदोलन करण्यात आले. इतकेच नाही तर वाहनांची तोडफोड देखील करण्यात आल्याचे प्रकार समोर आले. पोलिसांकडून अनेक आंदोलन कर्त्यांवर या प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -