Saturday, July 27, 2024
Homeकोल्हापूरनागाव फाट्याजवळ भरधाव ट्रकने दुचाकीला उडवले, तरुणाचा मृत्यू, एक जण जखमी

नागाव फाट्याजवळ भरधाव ट्रकने दुचाकीला उडवले, तरुणाचा मृत्यू, एक जण जखमी

दुचाकीवरून इंगळी (ता. हातकणंगले) येथील मामाकडे निघालेल्या भाच्याच्या दुचाकीला भरधाव ट्रकने उडवून फरफटत नेले. पुणे-बेंगळुरू महामार्गावर नागाव फाट्याजवळ रविवारी (दि.३) दुपारी साडेबाराच्या सुमारास झालेल्या अपघातात भाचा हर्षद सुनील बुद्रुक (वय २०) हा ठार झाला. त्याचा मित्र सुजल रामचंद्र बागणे (वय २०, दोघे रा. ऐतवडे बुद्रुक, ता. वाळवा, जि. सांगली) हा गंभीर जखमी झाला.

शिरोली एमआयडीसी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ऐतवडे बुद्रुक येथील हर्षद बुद्रुक आणि त्याचा मित्र सुजल बागणे हे दोघे रविवारी दुपारी इंगळी येथील मामाकडे निघाले होते. पुणे-बेंगळुरू महामार्गावरून जाताना नागाव फाट्याजवळ पाठीमागून आलेल्या भरधाव ट्रकने हर्षदच्या दुचाकीला उडवून काही अंतर फरफटत नेले. या भीषण अपघातात दुचाकीवर मागे बसलेला सुजल बाजूला फेकला गेल्याने गंभीर जखमी झाला, तर हर्षदच्या अंगावरून ट्रकचे चाक गेले. दोन्ही जखमींना १०८ रुग्णवाहिकेतून सीपीआरमध्ये दाखल करण्यात आले.

मात्र, उपचारापूर्वीच हर्षदचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. हर्षद हा तळसंदे येथील महाविद्यालयात शिक्षण घेत होता. तो स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या विद्यार्थी संघटनेचा वाळवा तालुका अध्यक्ष होता. त्याच्या पश्चात आई, वडील, बहीण, आजोबा असा परिवार आहे.अपघाताची माहिती मिळ‌ताच शिरोली एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना सीपीआरमध्ये पाठवले. अपघातास कारणीभूत ठरलेल्या ट्रकचालकास ताब्यात घेऊन पोलिसांनी ट्रक जप्त केला. ट्रक चालकावर गुन्हा दाखल केल्याची माहिती सहायक पोलिस निरीक्षक पंकज गिरी यांनी दिली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -