Saturday, July 27, 2024
Homeकोल्हापूरलोकसभेची तयारी झाली सुरू, जिल्हा पिंजून काढताहेत काँग्रेसचे इच्छुक

लोकसभेची तयारी झाली सुरू, जिल्हा पिंजून काढताहेत काँग्रेसचे इच्छुक

लोकसभेच्या कोल्हापूर मतदारसंघातून महाविकास आघाडीतून काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना की पुरस्कृत उमदेवार असणार हे भविष्यात ठरेल. महाविकास आघाडी आणि महायुतीत जागा कोणाला हे अजून निश्‍चित नाही, पण सर्वच पक्षांतील दिग्गज शांत असताना नवख्या इच्छुकांनी मात्र तयारी सुरू केली असून पक्षांतर्गत जागा निश्‍चितीनंतरच या लढतीचे चित्र स्पष्ट होईल. दरम्यान, ‘गोकुळ’ चे संचालक डॉ. चेतन नरके आणि अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे सचिव बाजीराव खाडे यांनी गेली दोन ते तीन वर्षांपासून लोकसभेच्या मैदानात उतरायचेच म्हणून कंबर कसली आहे. गावगावात संपर्क भेटी, सामाजिक, शैक्षणिक आणि वैयक्तिकरित्या मदत करुन आपला ठसा उमटवण्याचे काम केले जात आहे.डॉ. नरके यांनी महाविकास आघाडीकडून लढण्याची तयारी दर्शवली आहे. तर, श्री. खाडे काँग्रेसकडूनच निवडणूक लढवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाची निवडणूक काँग्रेसच्यावतीने आमदार पी.एन.पाटील किंवा आमदार सतेज पाटील यांनी लढावी, अशी कार्यकर्त्यांची मागणी आहे. मात्र या दोन्ही आमदारांकडून लोकसभा लढविण्याची फारशी इच्छा दिसत नाही.तरीही पक्ष जो निर्णय देईल तो मान्य करुन काम केले जाईल. अशी भूमिका दोन्ही आमदारांनी घेतली आहे. दरम्यान, चेतन नरके यांनी वैयक्तिकसह गोकुळच्या माध्यमातून शेतकरी, दुध उत्पादकांच्या भेटी गाठी घेत आहेत. दुध उत्पादन कसे वाढवावे, त्यांचे संगोपन कसे करावे याची माहिती देत. तरुणांना दुग्ध व्यवसात कशा संधी आहेत, याची माहिती पटवून देत आहेत. सहकार वाढीसाठीही त्यांचे प्रयत्न सुरु आहेत. बाजारीव खाडे कुंभी कासारी साखर कारखान्यात शेतकऱ्यांना न्याय देण्यासोबत मतदारसंघातील प्रत्येक गावात आणि गावातील प्रत्येक तरुण मंडळांना भेट देवून त्यांच्याशी त्यांच्या प्रश्‍नांवर चर्चा करत आहेत. सहकार टिकला पाहिजे आणि सहकार वाढला पाहिजे. शेती आणि शेतकरी वाचला पाहिजे याशिवाय महागाई, बेरोजगारी, उद्योगवाढीबद्दल तरुणांना मार्गदर्शन करत आहेत. डॉ. नरके सध्या महाविकास आघाडी म्हणून लोकसभेचे तिकिट मिळावे यासाठी प्रयत्न करत आहेत

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -