Sunday, December 22, 2024
Homeसांगलीसांगली : मोबाईलवर दंडाचा मेसेज आला अन् चोरीला गेलेल्या गाडीचा छडा लागला

सांगली : मोबाईलवर दंडाचा मेसेज आला अन् चोरीला गेलेल्या गाडीचा छडा लागला

दंडाचा मेसेज आला आणि बारा दिवसांपूर्वी चोरीला गेलेल्या आलिशान गाडीचा छडा लागला. अत्यंत नाट्यपूर्ण पद्धतीने तपास करत विटा पोलिसांनी संबंधित संशयित जेरबंद केले आणि गाडीही जप्त केली.रोहन बिरु सोनटक्के (वय २१, रा. मुरुम, ता. उमरगा, जि उस्मानाबाद) असे संशयिताचे नाव आहे.

 

याबाबत घडलेली हकीकत अशी की, गार्डी (ता. खानापूर) येथील संतोष भिकु भोईटे यांनी आपली पांढऱ्या रंगाची हुंडाई कंपनीची इलेंन्ट्रा सीआर डीआय एस एक्स (ओ) मॉडेलची आलिशान चार चाकी गाडी (क्र.एम एच११सी जी ४११६) ही गाडी विट्यातील एका मिस्त्रीकडे किरकोळ दुरुस्तीसाठी दिली होती. २४ ऑगस्ट रोजी रात्री ८.४१ वा ते ९.२० वाजण्याच्या सुमारास कुणीतरी त्यांची गाडी पळवून नेली. पहिल्या अर्धा तास त्यांना कोणी तरी आपली चेष्टा केली असावी असे वाटले. मात्र जवळच्या सर्व मित्रांकडे आणि नातेवाईकांकडे चौकशी करून गाडी बाबत माहिती न मिळाल्याने अखेरीस दुसऱ्या दिवशी म्हणजे २५ ऑगस्टला रात्री साडेअकरा वाजता संतोष भोईटे यांनी विटा पोलीस ठाणे गाठले आणि फिर्याद दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी विटा आणि परिसरातील सर्व रस्त्यांवरील सीसीटी व्ही फुटेज वगैरे मार्गे तपास सुरू केला.

 

दरम्यान दोन दिवसांपूर्वी संतोष भोईटे यांना त्यांच्या मोबाईलवर त्यांच्या गाडीची दंडाची पावती झाली असा मेसेज आला. त्यावरून त्यांनी पुन्हा विटा पोलीस ठाण्याचे संपर्क साधला. त्यावर संबंधित गाडी दौंड पास करून पुढे गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यावरून पुन्हा सीसीटीव्ही फुटेज आणि इतर तांत्रिक माहितीआधारे दोनदिवस वेषातंर करून संशयित रोहन बिरु सोनटक्के (वय २१, रा. मुरुम, ता. उमरगा, जि उस्मानाबाद) हा भोसरी (पुणे) येथे चोरी केलेल्या गाडीसह वास्तव्यास असल्याचे समजले. त्यावरून विटा पोलिसांनी तेथे परीसरात सापळा रचून त्यांस भोसरी येथील रानतारा कॉलनीत चोरी केलल्या अलिशान चारचाकी गाडीसह ताब्यात घेतले. त्यावेळी संशयित सोनटक्के याने पोलिसांच्या लक्षात आले परंतु संतोष भोईटे यांनी गाडीतील अत्याधुनिक जीपीएस यंत्रणा सुरू करून संबंधित गाडी स्वतःचीच असल्याचे पोलिसांना पटवून दिले. या तपासात विट्याचे पोलीस निरीक्षक संतोष डोके, पोलीस हेड कॉन्स्टेबल उत्तम माळी, हेमंत तांबेवाघ, महेश देशमुख, अक्षय जगदाळे,अमोल कराळे,प्रमोद साखरपे, महेश संकपाळ, विकास जाधव, कॅप्टन गुंडवाडे सांगलीच्या सायबर शाखेचे अजित पाटील, फारुख आणि पिंपरी चिंचवड पोलीस ठाण्याचे मारुती जसभाये यांनी सहभाग घेतला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -