ताजी बातमी ऑनलाईन टीम
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा आरक्षणाबाबात मोठी घोषणा केली आहे. ज्यांच्याकडे निजाम काळातील महसुली आणि शैक्षणिक नोंदी आहेत त्यांना कुणबी दाखला देणार, असं मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं आहे. विशेष म्हणजे यासबाबत लवकरच जीआर काढण्यात येणार असल्याची माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली. तसेच जुन्या नोंदी तपासण्यासाठी निवृत्ती न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत केलीय. ही समिती कागदपत्रांची पडताळणी करणार आहे. ही समिती पुढच्या एक महिन्यात अहवाल सादर करणार आहे, अशी माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली.
“ज्यांच्याकडे जुन्या नोंदी आहेत त्यांना कुणबी दाखले मिळतील. त्यासाठी आपले अधिकारी हैदराबाद येथील अधिकाऱ्यांशी संपर्क साधतील. मी देखील तिथल्या मुख्यमंत्र्यांशी संपर्क साधेल. अशाप्रकारच्या दोन अडचणी काढण्याचा प्रयत्न केला आहे”, असं एकनाथ शिंदे म्हणाले. तसेच प्रमाणपत्रांची पडताळणी आणि अभ्यास करण्यासाठी निवृत्त न्यायाधीश संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पाच सदस्यांची समिती गठीत करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.
मुख्यमंत्र्यांचं जरांगे पाटील यांना आवाहन
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी मनोज जरांगे पाटील यांना उपोषण मागे घेण्याची विनंती केली. सरकार मराठा आरक्षणासाठी सकारात्मक आहे. सर्व मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न सुरु आहेत. आपल्याला सुप्रीम कोर्टात आरक्षण टिकेल, अलं आरक्षण लागू करायचं आहे. त्यामुळे जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेऊन सरकारला सहकार्य करावं, असं आवाहन एकनाथ शिंदे यांनी केलं.
मराठा आरक्षणाबाबत सरकारचा मोठा निर्णय; GR काढणार असल्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -