Monday, October 2, 2023
Homeइचलकरंजीनिपाणीत घरफोडी ; २५ तोळे सोने, ३ लाख रोकड लंपास

निपाणीत घरफोडी ; २५ तोळे सोने, ३ लाख रोकड लंपास


निपाणी येथील नॅशनल सायकल दुकानचे मालक व चिमगांवकर गल्लीतील रहिवाशी रफीक अहमद मजीद पट्टेकरी यांचे बंद घर फोडून चोरट्याने २५ तोळे सोने व ३ लाख रूपयांची रोख रक्कम असा अंदाजे १६ लाख रूपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे. ही घटना मंगळवार दि. ५ रोजी सकाळी सव्वा अकरा वाजता घडली. रात्री उशिरा घरातील व्यक्ती आल्यानंतर त्यांना चोरीचा प्रकार लक्षात आला.

येथील रफिक अहमंद पट्टेकरी हे चिमगांवर गल्लीत आई, पत्नी, दोन मुले व एक मुलगी अशा परिवारास राहतात. मुलीचे लग्न ठरले असल्याने ते पत्नी व मुलीसह मुंबईला खरेदीला गेले होते. त्यांच्या आई या इचलकरजी येथील आपल्या नातेवाईकांकडे गेल्या होत्या. तर दोन मुले मंगळवारी सकाळी सायकल दुकानाकडे गेली होती. यावेळी पाळत ठेवणाऱ्या अज्ञात चोरट्याने मागील दारातून प्रवेश केला. आपण सीसीटीव्हीत दिसणार नाही याची खबरदारी घेत चोरट्याने आतील खोलीत दाराजवळ असलेली तिजोरी
निपाणी येथील पट्टेकरी यांच्या घरातील फोडलेली तिजोरी, दुसऱ्या छायाचित्रात चोरट्यांनी वापरलेले साहित्य. कटवणी, कटर व इतर साहित्याने फोडली. तिजोरीतील पाच तोळ्याची बोरमाळ, ५ तोळ्याचा टिक्का, ५ तोळ्याचा हार आणि इतर १० तोळ्याचे दागिने आणि रोख ३ लाख रूपये रक्कम घेवून पोबारा केला.गच्चीवर गेल्याने समोरील सीसीटीव्हीत तो ११.५७ मिनिटांनी जाताना दिसून आला आहे. रात्री उशिरा घर मालकांची मुले दुकान बंद करून परतल्यानंतर सदर घटना उघडकीस आली.
त्यानंतर त्यांनी तातडीने याची माहिती निपाणी शहर पोलिसांना दिली. पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. चोरट्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला.
घटनास्थळी सीपीआय बी. एस. तळवार, शहर फौजदार उमादेवी व सहकाऱ्यांनी भेट दिली. याबाबत रफिक अहमंद पट्टेकरी यांनी आज बुधवारी सकाळी पोलिसात फिर्याद दिली आहे.

गच्चीवर गेल्याने समोरील सीसीटीव्हीत तो ११.५७ मिनिटांनी जाताना दिसून आला आहे. रात्री उशिरा घर मालकांची मुले दुकान बंद करून परतल्यानंतर सदर घटना उघडकीस आली.
त्यानंतर त्यांनी तातडीने याची माहिती निपाणी शहर पोलिसांना दिली. पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. चोरट्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला.


घटनास्थळी सीपीआय बी. एस. तळवार, शहर फौजदार उमादेवी व सहकाऱ्यांनी भेट दिली. याबाबत रफिक अहमंद पट्टेकरी यांनी आज बुधवारी सकाळी पोलिसात फिर्याद दिली आहे.

RELATED ARTICLES

ब्रेकिंग न्यूज

महाराष्ट्र