Saturday, October 12, 2024
Homeराजकीय घडामोडीपुन्हा नोटा बंदी करावी लागणार? विजय वडेट्टीवार यांची भीती : Nota...

पुन्हा नोटा बंदी करावी लागणार? विजय वडेट्टीवार यांची भीती : Nota Bandi

केंद्र सरकारने इंडिया या शब्दाऐवजी भारत शब्द वापरण्याचा घाट घातला आहे. त्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. सरकारने विशेष अधिवेशन बोलावलं असून त्यात याबाबतचा निर्णय होण्याची शक्यता आहे. इंडिया शब्द बदलण्यासाठी केंद्र सरकार विधेयक आणणार असल्याचीही चर्चा आहे. तशी चर्चाही देशात सुरू आहे. एवढेच नव्हे तर या निमित्ताने इंडिया आणि भारत या नावावरून दोन गट निर्माण झाले आहेत. पण इंडिया शब्द बदलला आणि भारत हा शब्द घेतला तर अनेक ठिकाणी तो बदल करावा लागणार आहे. Nota Bandi

राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांना तर इंडिया ऐवजी भारत शब्द वापरल्यास नोटाबंदी होण्याचीही भीती वाटत आहे. विजय वडेट्टीवार मीडियाशी संवाद साधत होते. केंद्र सरकार संविधानातील इंडिया शब्द बदलण्यासाठी विधेयक आणणार आहे. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. हे घाबरण्याचे लक्षण आहे. इंडिया म्हणजे भारत हे संविधानात लिहिले आहे. मग नोटांवर ही भारत लिहावे लागेल, कारा नोटबंदी मग. हे सगळं इंडिया आघाडीला घाबरून चालले आहे. राहुल गांधी यांच्या दहशतीमुळेच हे सुरू आहे, अशी टीका विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.Nota Bandi

Nota Bandi विजय वडेट्टीवार यांनी यावेळी राज्य सरकारवरही टीका केली. आताचे सरकार म्हणाजे तिजोरी लुटणारे सरकार आहे. पूर्वी आली बाबा चाळीस चोर म्हणायचे. मात्र आता दोन आली बाबा 80 चोर आहेत, अशी राज्याची स्थिती आहे, अशी टीका वडेट्टीवार यांनी केली. 56 इंच छाती फुगवून सांगणाऱ्यांना दुसऱ्याची घर फोडायची वेळ आलीय. कारण तुम्ही स्वकर्तुत्वाने काहीही मिळविले नाही. टीव्ही एक आणि रिमोट तीन अशी राज्याची स्थिती झाली आहे. ज्याला जे बटण दबायचे ते दाबतो आणि तिजोरी लुटतो, असे काम राज्यात सुरू आहे, असा हल्लाही त्यांनी चढवला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -