Sunday, December 22, 2024
Homeराशी-भविष्य10 सप्टेंबरला तयार होणार रवि पुष्य योग, तीन राशींना मिळणार नशिबाची साथ...

10 सप्टेंबरला तयार होणार रवि पुष्य योग, तीन राशींना मिळणार नशिबाची साथ (Rashibhavishya)

27 नक्षत्रांमध्ये पुष्य नक्षत्र हे शुभ नक्षत्र गणलं जातं.पुष्य नक्षत्राचं स्वामित्व शनिकडे आहे. पुष्य नक्षत्र गुरुवार किंवा रविवारी आलं की शुभ मानलं जातं. गुरुवारी पुष्य नक्षत्र असलं की गुरुपुष्यामृत योग असतो. रविवारी पुष्य नक्षत्र आलं की, रविपुष्य योग म्हणून संबोधलं जातं. हा अंत्यत दुर्लभ योग गणला जातो. 10 सप्टेंबर 2023 रोजी रविवार असून या दिवशी पुष्य नक्षत्र असल्याने रवि पुष्य योग जुळून आला आहे.Rashibhavishya

या दिवशी एकादशी असल्याने या दिवसाचं महत्त्व आणखी वाढलं आहे. हा योग 10 सप्टेंबरला संध्याकाळी 5 वाजून 6 मिनिटांनी सुरु होईल आणि 11 सप्टेंबरला सकाळी 6 वाजून 15 मिनिटांपर्यंत असेल. या दिवशी सोनं-चांदी, वाहन, घर किंवा संपत्ती खरेदी करणं शुभ मानलं जातं. ज्योतिषशास्त्रानुसार हा दिवस काही राशींसाठी खास असणार आहे. चला जाणून घेऊयात या राशी कोणत्या त्या..Rashibhavishya

Rashibhavishya या राशींना मिळणार रविपुष्य योगाचा लाभ
मिथुन : या राशीच्या जातकांना रवि पुष्य योग लाभदायी ठरणार आहे. देवी लक्ष्मीची कृपा या राशीच्या जातकांवर असेल. उत्पन्नाचे नवे स्रोत या कालावधीत खुले होतील. तसेच नशिबाची पूर्ण साथ या कालावधीत मिळेल. आत्मविश्वासात वाढ होईल आणि त्यामुळे काही मोठे निर्णय घेऊ शकता. आपल्या वाणीचा प्रभाव इतरांवर पडेल.

सिंह : या राशीच्या जातकांनाही दुर्लभ अशा रवि पुष्य योगाचा लाभ मिळेल. सूर्याची ही स्वरास असून यात राशीत सूर्यदेव आहेत. त्यात पुष्य नक्षत्र असल्याने या राशीच्या जातकांना सकारात्मक परिणाम दिसून येतील. गेल्या काही दिवसांपासून अडकलेली कामं पूर्ण होतील. तसेच गुंतवणुकीचा विचार करत असाल तर ही वेळ योग्य ठरेल. वाहन किंवा संपत्ती खरेदीचं स्वप्न पूर्ण होईल.

तूळ : या राशीच्या जातकांनाही विशेष लाभ मिळणार आहे. कौटुंबिक स्तरावर चांगला वेळ व्यतित कराल. आई वडिलांसोबत गेल्या दिवसात खराब झालेले संबंध सुधारतील. करिअरमध्ये योग्य ती उंची गाठाल. समाजात मानसन्मान वाढेल. व्यवसायात जितकी मेहनत घ्याल त्याच्या दुप्पट फळ तुम्हाला मिळेल. मुलांकडून काही चांगल्या बातम्या कानावर पडतील. Rashibhavishya

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -