Monday, September 25, 2023
Homeइचलकरंजीपंचगंगा नदीतीरी पंचगंगेश्वर शिव मंदिराची पायाभरणी!

पंचगंगा नदीतीरी पंचगंगेश्वर शिव मंदिराची पायाभरणी!

इचलकरंजी, येथील पंचगंगा नदीतीरावरील स्मशानभूमीलगतच श्री महादेव मंदिराची उभारणी करण्यात येणार आहे. या पंचगंगेश्वर शिव मंदिराची पायाभरणी व भूमिपुजन समारंभ ट्रस्टचे अध्यक्ष प्रकाश दत्तवाडे व सौ. जयश्री दत्तवाडे दाम्पत्याच्या हस्ते शुक्रवारी संपन्न झाला. पंचगंगेश्वर शिव भक्त ट्रस्टच्या माध्यमातून आणि आमदार प्रकाश आवाडे यांचे मार्गदर्शन व पुढाकारातून या मंदिराची उभारणी केली जात आहे. इचलकरंजी शहरालगतच वाहत असलेल्या पंचगंगा नदी काठावर स्मशानभूमी आहे.

या स्मशानभूमीलगतच असलेल्या जागेत शिव मंदिर उभारण्याचा संकल्प करण्यात आला आणि आमदार प्रकाश आवाडे यांच्या माध्यमातून व सहकार्यातून त्याची सुरुवात झाली. यासाठी पंचगंगेश्वर शिव भक्त ट्रस्टची मंदिराचे भूमीपुजन करताना प्रकाश दत्तवाडे व सौ. जयश्री दत्तवाडे शेजारी इतर मान्यवर. स्थापना करण्यात आली आहे. त्या माध्यमातून शुक्रवारी सकाळी ट्रस्टचे अध्यक्ष प्रकाश दत्तवाडे आणि सौ. जयश्री दत्तवाडे या दाम्पत्याच्या हस्ते मंदिर उभारणीसाठी भूमिपुजन व पायाभरणी समारंभ पार पडला. याप्रसंगी धार्मिक विधी केशव पेटकर व उदय गोखले यांनी केले.

या शिव मंदिराची लवकरात लवकर उभारणी करुन ते
जनतेसाठी खुले करण्यात येणार असल्याचे ट्रस्टचे अध्यक्ष प्रकाश दत्तवाडे यांनी सांगितले. या कार्यक्रमप्रसंगी जिल्हा परिषद माजी सदस्य डॉ. राहुल आवाडे, ट्रस्टचे उपाध्यक्ष केशव पेटकर, सेक्रेटरी बाळासाहेब कलागते, विश्वस्त उदय गोखले, शशिकांत नेजे, द्वारकाधिश सारडा, चंद्रशेखर शहा, बाबासो पाटील, संजय आरेकर, विजय माळी, परसनाथ घाट आदी उपस्थित होते.

RELATED ARTICLES

ब्रेकिंग न्यूज

महाराष्ट्र