Tuesday, November 28, 2023
Homenewsपैसे न दिल्याच्या रागातून मुलाकडून जन्मदात्या आईची हत्या,

पैसे न दिल्याच्या रागातून मुलाकडून जन्मदात्या आईची हत्या,

सोलापुरातील शेळगी परिसरातील घटना पैसे न दिल्याच्या रागातून मुलानेच जन्मदात्या आईची हत्या केल्याची धक्कादायक घटना सोलापुरात घडली. मध्यरात्री दीड वाजताच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडलीय. शेळगी येथील मित्र नगर परिसरात राहणाऱ्या वंदना कोळेकर यांची हत्या त्यांचा मुलगा अतुल यानेच केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी अतुल एकनाथ कोळेकर याला ताब्यात घेतले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार अतुल याला दारूचे व्यसन होते. अतुल याने आई वंदना एकनाथ कोळेकर हिच्याकडे पैशाची मागणी केले होती. आईने पैसे न दिल्याच्या रागातून अतुल याने हे टोकाचे पाऊल उचलले असल्याचा अंदाज आहे.
फिर्यादी राजकुमार कलावंत हे मृत महिलेच्या घरातच भाड्याने राहाय होते. यावेळी रात्री त्यांनी वंदना कोळेकर आणि मुलगा अतुल कोळेकर दोघे मोठ्याने भांडत असल्याचा आवाज ऐकला. यावेळी फिर्यादीने वर जाऊन पाहिलं त्यावेळी आरोपीने आईच्या डोक्यात कुकरीसारख्या धारदार शस्त्राने हल्ला केलेला होता. घटनेची माहिती मिळताच जोडभावी पेठ पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. रात्री घटनास्थळाचा पंचनामा करून संशयित आरोपी अतुल एकनाथ कोळेकर याला ताब्यात घेतले आहे. आरोपिकडून अजून चौकशी सुरू असल्याची माहिती पोलीस निरीक्षक बाळासाहेब भालचिम यांनी दिली.

अतुल कोळेकर हा लहान असतानाच त्याचे वडील एकनाथ यांचा मृत्यू झाला होता. 2019 मध्ये भावाचा देखील मृत्यू झाला होता. लहानपणीच वडिलांचं छत्र हरपलेल्या अतुल आणि त्याच्या भावाचा सांभाळ आईनेच केला. अतुल सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत हमाली करीत होता. मिळालेल्या माहितीनुसार त्याला अधूनमधून फिट्स येत होते. त्याच्यावर औषधोपचार देखील सुरू होते. वर्षभरपूर्वीच कर्नाटकातील एका मुलीशी त्याचा विवाह झाला होता. मात्र, त्याच्या जुगार आणि दारूच्या सवयीमुळे सातत्याने भांडण होत होती. अतुलच्या त्रासाला कंटाळून पत्नी देखील काही महिन्यांपासून माहेरी राहायला गेली होती. अतुलने आईकडे पैशांची मागणी केली. मात्र, आईने त्याला पैसे देण्यास नकार दिला. त्यामुळे दोघात रात्री वाद झाला. याच वादातून अतुलने आपल्या जन्मदात्या आईचीच हत्या केलीय.

RELATED ARTICLES

ब्रेकिंग न्यूज

महाराष्ट्र