Sunday, December 22, 2024
Homenewsयंदाही दहिहंडीला परवानगी नाही; मुख्यमंत्री, दहीहंडी उत्सव आयोजकांच्या बैठकीत निर्णय

यंदाही दहिहंडीला परवानगी नाही; मुख्यमंत्री, दहीहंडी उत्सव आयोजकांच्या बैठकीत निर्णय


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गोविंदा पथकं आणि दहिहंडी उत्सव आयोजक यांच्यात दहिहंडीच्या आयोजनासंदर्भात महत्त्वाची बैठक सध्या सुरु आहे. दहिहांडीऐवजी मानाची दहीहंडी फोडण्यास परवानगी द्या, अशी मागणी गोविंदा पथकांची होती. तसेच गर्दी टाळण्यासाठी सुरक्षेचं पाऊल उचलावं लागेल, अशी भूमिका मुख्यमंत्र्यांनी मांडली. त्यानंतर सर्व बाबींवर सखोल चर्चा केल्यानंतर यंदाही दहिदंडीला परवानगी देण्यात आलेली नाही.


बैठकीत बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, “आपल्या सर्वांच्या भावना सारख्याच आहेत. आपले सण आपण जपलेच पाहीजेत. पण, आता प्रश्नं आरोग्याचा आहे. याचा विचार करता आपल्याला आरोग्याचा विचारालाच प्राधान्यांनं करावा लागेल. आम्ही असा निर्णय घेताना अनेकजण आंदोलन करणार असल्याचं जाहीर करतात. मग, आंदोलन करायचं असेल तर कोरोना विरोधात करा ना.”


“बाळ गोपाळांचा हा उत्सव आहे. गेल्या वर्षीपासून जी लहान बालकं अनाथ झालेली आहेत. त्यांची काय अवस्था आहे हे आपण पहावं. लस घेतल्यावर देखील काही देशांत लॉकडाऊन करण्यात आला आहे. इस्त्रायलनं तर पुन्हा मास्क घालायला सुरुवात केली आहे. अर्थ चक्र चालवण्यासाठी आपण थोडी शिथिलता दिली आहे. कारण अनेकांची हातावर पोटं आहेत. त्यांच्यासाठी आपण हा निर्णय घेतला आहे. आपण जर समजूतीनं वागलो नाही तर धोका अटळ आहे. एकदा हे संकट पूर्णपणे घालवूया. आपण यंत्रणेत कुठेही ढिलाई होऊ देत नाही. नीती आयोगानं जे सांगितलंय, ते लक्षात घेतलं पाहीजे. गेल्या दीड वर्षात आपण जी आरोग्य सेवा वाढवली आहे, ती इतर कोणत्याही राज्यानं वाढवलेली नाही.”, असंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

“आपण दुसऱ्या लाटेत डॉक्टरांच्या मेहनतीमुळे बाहेर पडलोय. आता जी विंडो आपल्याला मिळाली आहे. तिचा वापर आपण थोडं अर्थचक्र सावरण्यासाठी करूया. पुन्हा ती काळरात्र नको. जनतेचे प्राण वाचवण्यासाठी आपण आपली संस्कृती परंपरा देखील काहीवेळ बाजूला ठेवून समजूतीने गर्दी टाळण्यासाठी आपल्याला सुरक्षेचे पाऊल उचलावं लागेल.”, असंही मुख्यमंत्री म्हणाले.


दहीहंडी समन्वय समितीनं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे काय मागण्या केल्या होत्या?


1. आम्हाला आमच्या जागेवरची मानाची दहीहंडी फोडण्यास परवानगी मिळावी.
2. दहीहंडी फोडताना मानवी मनोरे उभारण्यासाठी सर्व गोविदांचे दोन्ही लसीकरण पूर्ण करणं आवश्यक आहे. तशी तयारी गोविंदा पथकांनी केली आहे.
3. गोविंदा पथक हे दुसरीकडे कुठेही दहीहंडी फोडण्यासाठी जाणार नाहीत.
4. कोविड-19 संसर्गाची जाणीव ठेवूनच सुरक्षित दहीहंडी उत्सव आम्हाला आमच्या जागेवरच करण्याची परवानगी द्यावी.
5. दहीहंडी फोडताना कोणतीही गर्दी होणार नाही याची काळजी गोविंदा मंडळं घेतील.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -