Sunday, December 22, 2024
Homeकोल्हापूरकोणालाही इतरांच्या दारात जाण्याची वेळ येऊ नये; अंबाबाईचं दर्शन घेत पंकजा मुंडेंचं...

कोणालाही इतरांच्या दारात जाण्याची वेळ येऊ नये; अंबाबाईचं दर्शन घेत पंकजा मुंडेंचं सूचक विधान

माझी शिवशक्ती परिक्रमा ही लोकांच्या मनातील भावना जाणून घेण्यासाठी आहे. लोक माझे स्वागत मुंडे स्टाईलने करतात. जी गोष्ट सभेत, बैठकीत बोलू शकत नाहीत, ती माझ्याशी बोलतात. माझी परिक्रमा राजकीय नसल्याचे माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी सांगितले.काल त्यांनी श्री अंबाबाईचे दर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. मुंडे म्हणाल्या, ‘परिक्रमेच्या निमित्ताने मी राज्यातील विविध तीर्थक्षेत्रांचे दर्शन घेत आहे. यावेळी माझे गोपीनाथ मुंडे यांच्याप्रमाणेच स्वागत होत आहे. लोकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.

ते माझ्याशी वैयक्तिक बोलतात. त्यांच्या मनातील गोष्टी जाणून घेण्यासाठी ही परिक्रमा आहे.’ खासदार धैर्यशील माने, जिल्हाध्यक्ष राजवर्धन निंबाळकर, प्रदेश सचिव महेश जाधव उपस्थित होते.कोणी उपाशीपोटी झोपू नये’श्री अंबाबाई देवीकडे काय मागितले, यावर मुंडे म्हणाल्या, ‘देवीचे रूप इतके सुंदर आहे की मी ते पाहातच राहिले. मागायचे राहूनच गेले. अंबाबाईने सर्वांना सर्वकाही दिलेच आहे. पण, अशी इच्छा आहे की कोणी उपाशीपोटी झोपू नये. कोणालाही इतरांच्या दारात जाण्याची वेळ येऊ नये आणि आपल्या दारात आलेली व्यक्ती रिकाम्या हाती जाऊ नये.’

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -