कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गावरील (Kolhapur-Ratnagiri Highway) आंबेवाडी येथील रेडेडोहजवळ काल संध्याकाळी भरधाव मोटारीने रिक्षा आणि दोन दुचाकींना जोरदार धडक दिली. यामध्ये मोटारसायकलस्वार पंकज भाऊसाहेब जाधव (वय २०, रा. दरेवाडी, ता.पन्हाळा) जागीच ठार झाला.चारही वाहनांमधील ११ जण गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक अर्धा तास ठप्प होती. करवीर पोलिस निरीक्षक अरविंद काळे यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सुंदर बिदगर मूळचे नगर जिल्ह्यातील असून, काल ते आपल्या कुटुंबासह जोतिबा दर्शनासाठी मोटारीतून आले होते. यावेळी त्यांचा मोटारीवरील ताबा सुटल्याने भरधाव मोटार एका दुचाकीला धडकली.दुचाकीवरील पंकज मोटारीखाली आल्याने जागीच ठार झाला. त्याच्या मागे बसलेला गणेश उडून बाजूला पडल्याने गंभीर जखमी झाला. याचवेळी बाजूने जाणाऱ्या रिक्षालाही या मोटारीने धडक दिली. धडक इतकी जोरदार होती की रिक्षा उडून बाजूच्या शेतात पडली. त्यानंतर याच मोटारीने आणखी एका दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीवरील दोघे जखमी झाले.अपघातात मोटारीमधील सुंदर (४०), शांता सुंदर बिदगर (३६), मुलगा गीतेश (१०) आणि कमलाबाई बिदगर (चौघे रा. डिग्रज, ता. संगमनेर) जखमी झाले. रिक्षाचालक मुस्ताक अजीज शेख (५२, रा. मंगळवार पेठ) यांच्यासह रिक्षातील रुचिरा अभिजित आंबोजकर (४०), अभिजित आंबोजकर (४५), आघना अभिजित आंबोजकर (५, तिघे रा. मुंबई) जखमी झाले.
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -