भारतात सध्या 5G नेटवर्कचा मोठ्या प्रमाणात विस्तार होतो आहे. यातच सरकारने 6G साठी देखील तयारी सुरू केली आहे. यासाठी आता अमेरिका देखील भारताची मदत करणार आहे. G20 परिषदेमध्ये अमेरिका आणि भारतात यासाठी करार झाला आहे.अमेरिका-भारत करारभारतात तंत्रज्ञान विस्तारासाठी भारत 6G अलायन्स आणि नेक्स्ट जी अलायन्स या दोन संस्थांमध्ये करार झाला. एटीआयएसचे अध्यक्ष आणि सीईओ सुझन मिलर आणि भारत 6G अलायन्सचे अध्यक्ष एनजी सुब्रमण्यम यांनी यावर स्वाक्षरी केली.Next G Allianceएटीआयएसने मांडलेली एक नवीन संकल्पना म्हणजे नेक्स्ट जी अलायन्स 6G. या समूहामध्ये अमेरिकेतील कित्येक कंपन्यांचा समावेश आहे. पुढील दशकामध्ये उत्तर अमेरिकेत वायरलेस उद्योग वाढीसाठी प्रयत्न करणे हे याचं उद्देश्य आहे. हा समूह आता भारताचीही 6G तंत्रज्ञानासाठी मदत करणार आहे.भारतामध्ये 6G तंत्रज्ञान आणण्याचं उद्देश्य हे सामान्य नागरिकांसाठी अधिक प्रगत तंत्रज्ञान उपलब्ध करुन देणे हे आहे. या माध्यमातून केवळ टेलिकम्युनिकेशनच नाही तर रिसर्च, डिझाईन, सुरक्षा आणि इतर कित्येक क्षेत्रांमध्ये प्रगती होणार आहे.
6G तंत्रज्ञानासाठी अमेरिका करणार भारताची मदत; G20 परिषदेच्या बैठकीत दोन्ही देशांमध्ये करार!
RELATED ARTICLES
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -