Tuesday, July 29, 2025
Homeइचलकरंजीसुळकूडचे पाणी इचलकरंजीला मिळणारच; आमदार प्रकाश आवाडे

सुळकूडचे पाणी इचलकरंजीला मिळणारच; आमदार प्रकाश आवाडे

‘शासनाने सुळकूड उद्भव दूधगंगा योजना (Sulkud Water Scheme) मंजूर केलेली आहे. त्यामुळे सुळकूडचे पाणी मिळणारच असल्याने त्यासाठी आपल्याला आंदोलन करण्याची काहीच गरज नाही,’ अशी स्पष्टोक्ती आमदार प्रकाश आवाडे (Prakash Awade) यांनी दिली.

इचलकरंजीला पाणीपुरवठा करणाऱ्या‍य कृष्णा योजनेची ५.२ किलोमीटरची मुख्य जलवाहिनी बदलण्यात येणार आहे. त्या कामासंदर्भात मंगळवारी आमदार आवाडे यांनी इचलकरंजी ते मजरेवाडीपर्यंत होणाऱ्या‍ कामाची प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली.

यावेळी महापालिकेचे जलअभियंता सुभाष देशपांडे, शाखा अभियंता बाजी कांबळे, ताराराणी पक्षाचे अध्यक्ष प्रकाश दत्तवाडे, बाळासाहेब कलागते, अहमद मुजावर आणि ठेकेदार मौला बागवान उपस्थित होते. यावेळी आमदार आवाडे यांनी सातत्याने गळती लागणाऱ्या‍ ठिकाणाची पाहणी करीत त्याठिकाणी केल्या जाणाऱ्या‍ क्रॉस पाइपचे काम तातडीने हाती घेण्याच्या सूचना केल्या. त्यानंतर मजरेवाडी येथील कामाची पाहणी करुन माहिती जाणून घेतली. यावेळी त्यांनी स्पष्ट शब्दात आपली भूमिका मांडली.

‘कृष्णा योजनेला विरोध करणारे आता सुळकूडचा (Sulkud Water Scheme) प्रश्‍न मीच सोडविणार हे समजल्याने आमच्या बरोबर राहण्याचा काहीजण प्रयत्न करीत आहेत. केवळ राजकारणासाठी राजकारण करणारी मंडळी एका बाजूला आली आहेत. एका योजनेला विरोध करुन दुसऱ्या‍ योजनेसाठी पळापळ करीत आहेत, अशी टीका करीत पुढील आठवड्यात ‘इचलकरंजीचा पाणीप्रश्‍न आणि माझी भूमिका’ या विषयावर आपण जाहीर सभेत जनतेसमोर मत मांडणार आहे, असे आमदार आवाडे यांनी यावेळी सांगितले.

‘जॅकवेलच्या ठिकाणी शासन निर्देशानुसार प्रावीण्यप्राप्त व्यक्तीची गरज असते, परंतु प्रत्यक्षात त्याठिकाणी कोणतेही काम न करता महापालिकेला लुटणाऱ्या‍ टोळीतील काही मंडळींनी तेथे आपली मक्तेदारी निर्माण केली आहे. त्यांचाही समाचार आपण घेणार आहे,’ असे आवाडे यांनी यावेळी जाहीर केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -