केंद्र सरकारकडून देशातील जनतेच्या भल्यासाठी सातत्याने वेगवेगळ्या योजना राबवल्या जातात. काही योजना या विशेषकरून महिला,कृषी उद्योग व बाल्शिक्षणासाठी असतात. महिलांसाठी राबवल्या जाणाऱ्या अनेक योजनांपैकी एक म्हणजे प्रधानमंत्री उज्वला योजना (Ujjwala Yojana 2.0) या योजनेअंतर्गत महिलांना मोफत मध्ये गॅस कनेक्शन दिले जाते. हल्लीच झालेल्या केबिनेट कमिटी ऑफ इकोनोमिक अफेर्सच्या साप्ताहिक बैठकीत उज्वला योजना 2.0 स्कीम सुरु करण्याची घोषणा करण्यात आली. सरकारच्या या निर्णयाने महिलांवर काय परिणाम होईल? त्यांना नेमका कसा फायदा होईल हे आज आपण जाणून घेऊया.काय आहे उज्वला योजना 2.0 (Ujjwala Yojana 2.0)?
या योजनेच्या अंतर्गत केंद्र सरकार महिलांना 75 लाख मोफत LPG Connections पोहोचवणार आहे. येत्या तीन वर्षात हे मोफत सिलिंडर महिलांपर्यंत पोहोचवले जातील. Ujjwala Yojana 2.0 या योजनेचा फायदा होणाऱ्या लाभार्थींची संख्या 10.35 कोटी होणार आहे.
Ujjwala Yojana 2.0 साठी सरकारने किती फंड जमवला?
प्रधानमंत्री उज्वला योजनेसाठी एकूण 1,650 करोड रुपयांचा फंड जमवण्यात आला. या योजनेसाठी लागणारा सर्व खर्च केंद्र सरकारकडून करण्यात येणार आहे. याआधी देखील रक्षाबंधन आणि ओणम या सणांच्या वेळी सरकार कडून सिलिंडरच्या किमती कमी करण्यात आल्या होत्या.
या योजनेमुळे किती जणांना होईल फायदा?
सरकारकडून प्रधानमंत्री उज्वला योजनेची सुरुवात वर्ष 2016 मध्ये करण्यात आली होती. Ujjwala Yojana 2.0 BPL म्हणजेच दारिद्र्य रेषेच्या खाली असलेल्या महिलांना सरकार मदत करणार आहे. BPL Card धारकांनाच केवळ या योजनेचा लाभ घेता येईल. योजनेचा भाग बनण्यासाठी तुमची कौटुंबिक मिळकत 27,000 रुपयांपेक्षा कमी असणे आवश्यक आहे.
कसे मिळवाल गॅस कनेक्शन ?
या योजनेचा भाग बनण्यासाठी https://popbox.co.in/pmujjwalayojana/ या अधिकृत साईटला भेट द्या.
या नंतर समोर येणारा फॉर्म भरून आपला अर्ज पूर्ण करा व जवळच्या Gas Agency मध्ये जमा करा.
आवश्यक कागदपत्रांची चौकशी झाल्यानंतर तुम्हाला नवीन Gas Connection दिलं जाईल.