Sunday, December 22, 2024
Homeब्रेकिंगमराठा समाजातील विद्यार्थ्यांना मिळणार इतकी शिष्यवृत्ती, असा करा अर्ज!

मराठा समाजातील विद्यार्थ्यांना मिळणार इतकी शिष्यवृत्ती, असा करा अर्ज!

मराठा व कुणबी समाजातील विद्यार्थ्यांसाठी सारथी शिष्यवृत्ती देण्यात येत असून 2023-24 या शैक्षणिक वर्षासाठी पात्र विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था पुणे या महाराष्ट्र शासनाच्या स्वायत्त्यसंस्थेद्वारे छत्रपती राजाराम महाराज सारथी शिष्यवृत्ती दिली जाते.
सारथी शिष्यवृत्ती काय आहे? कुणासाठी आहे? पात्रता काय? कागदपत्रे कोणती लागतील? अर्ज कसा व कुठे करावा? याविषयी संपूर्ण माहिती जाणून घेऊया…

सारथी शिष्यवृत्ती काय आहे?

छत्रपती राजाराम महाराज सारथी शिष्यवृत्तीसाठी इयत्ता नववी, दहावी,अकरावी या वर्गातील मराठा, कुणबी, कुणबी -मराठा व मराठा- कुणबी या गटातील पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्षात प्रतिमाह ८०० रुपये प्रमाणे वर्षाला 89 हजार सहाशे रुपये शिष्यवृत्ती दिली जाते.

मराठा व कुणबी समाजातील आर्थिक परिस्थिती दुर्बल असणाऱ्या होतकरू व हुशार विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत करणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.

काय आहे पात्रता?

सारथी शिष्यवृत्ती २०२३-२४ चा लाभ घेण्यासाठी विद्यार्थी हा इयत्ता ९ वी, इयत्ता १० वी व इयत्ता ११ वी या वर्गात शिक्षण घेत असावा.
या शिष्यवृत्तीचा लाभ मराठा, कुणबी, मराठा-कुणबी व कुणबी-मराठा या चार गटातील विद्यार्थी घेऊ शकतात.
राज्यातील सर्व शासकीय, शासनमान्य, अनुदानित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळेत जी विद्यार्थी शिक्षण घेत आहेत, असे विद्यार्थी सारथी शिष्यवृत्ती करिता पात्र आहेत.
NMMS ही परीक्षा उत्तीर्ण झालेल्या व केंद्र शासनाची शिष्यवृत्ती अपात्र असलेल्या व इयत्ता ९ वी मध्ये शिकत असलेल्या मराठा, कुणबी, मराठा-कुणबी व कुणबी-मराठा या लक्षित गटातील अर्ज केलेल्या पात्र विद्यार्थ्यांना छत्रपती राजाराम महाराज सारथी शिष्यवृत्ती मात्र समजण्यात येईल.


इयत्ता १० वी मध्ये नियमित शिकत असणाऱ्या विद्यार्थ्यांनी इयत्ता ९ वी मध्ये 55% टक्के गुणांसह वार्षिक परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
इयत्ता ११ वी मध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांनी इयत्ता १० वी मध्ये 60% गुणांसह वार्षिक परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
इयत्ता नववी मधील प्रस्तुत शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थ्यांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न रु. 3,50,000/- पेक्षा कमी असावे. इयत्ता १० वी व ११ वी मधील प्रस्तुत शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थ्यांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न रु. 1,50,000/- पेक्षा कमी असावे.


कोण ठरेल अपात्र?

विनाअनुदानित शाळेत शिकणारे विद्यार्थी तसेच स्वयं अर्थसहाय्यित शाळेतील विद्यार्थी व ज्युनियर कॉलेज मधील विद्यार्थी.
केंद्रीय विद्यालयात शिकणारे विद्यार्थी.
जवाहर नवोदय विद्यालयात शिकणारे विद्यार्थी.
शासकीय वस्तीगृहाच्या सवलतीच्या भोजन व्यवस्थेचा व शैक्षणिक सुविधेचा लाभ घेणारे विद्यार्थी.

सैनिक शाळांमध्ये शिकणारे विद्यार्थी.
आवश्यक कागदपत्रे कोणती?

छत्रपती राजाराम महाराज शिष्यवृत्ती साठी आवेदन करताना विद्यार्थ्यांकडे खालील कागदपत्रे असणे आवश्यक आहेत.
विद्यार्थ्यांच्या स्वाक्षरीत विहित नमुन्यात शिष्यवृत्तीस मागणी केलेला अर्ज. इयत्ता ९ वी, १० वी व ११ वी साठी स्वतंत्र अर्ज करणे आवश्यक आहे.
मुख्याध्यापकांचे / प्राचार्यांचे स्वाक्षरीत विहित नमुन्यातील शिफारस पत्र.
विद्यार्थ्यांच्या पालकांचा तहसीलदारांच्या स्वाक्षरीतील चालू वर्षातील उत्पन्नाच्या दाखल्याची सत्य प्रत.
विद्यार्थ्यांच्या आधार कार्डची सत्य प्रत.
विद्यार्थ्यांचे स्वतःचे नावे बँक पासबुक च्या पहिल्या पानाची सत्य प्रत ( नाव, खाते क्रमांक, IFSC कोडसह नमूद असणे आवश्यक आहे.)
इयत्ता १० वी च्या विद्यार्थ्यांनी इयत्ता ९ वी च्या वार्षिक परीक्षेत 55% गुणासह पहिल्या प्रयत्नात उत्तीर्ण असलेल्या गुणपत्रिकेची सत्यप्रत.
इयत्ता ११ वी च्या विद्यार्थ्यांनी इयत्ता १० वी च्या वार्षिक परीक्षेत 60% गुणासह पहिल्या प्रयत्नात उत्तीर्ण असलेल्या गुणपत्रिकेची सत्यप्रत.
NMMS परीक्षा उत्तीर्ण गुणपत्रक/ निकाल पत्रक.
अन्य् अनावश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडण्याची आवश्यकता नाही.


कुठे कराल अर्ज?

शाळा स्तरावर अर्ज भरून कागदपत्रांसह गट शिक्षणाधिकारी कार्यालय येथे जमा करणे व ऑनलाइन लिंक वर माहिती भरता येते.

गट शिक्षणाधिकारी यांनी तालुका स्तरावर अर्जाची छाननी व पडताळणी केलेले अर्ज माध्यमिक शिक्षणाधिकारी यांना सादर करावे.
माध्यमिक शिक्षणाधिकारी यांनी सर्व अर्ज मा. व्यवस्थापकीय संचालक, छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था, Sarthi Pune महाराष्ट्र ४११००४ या पत्त्यावर सादर करावे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -