राजारामपुरीतील मुख्य मार्गावरून आगमन मिरवणुकीसाठी केवळ ४३ मंडळांनाच सोडतीमधून (लकी ड्रॉ) परवानगी मिळाली. उर्वरीत मंडळांना पर्यायी मार्गाचा वापर करावा लागणार आहे. खरे मंगल कार्यालयात झालेल्या सोडतीत मंडळांची क्रमवारीही निश्चित केली आहे. त्याच क्रमाने मिरवणूक मार्गावर प्रवेश दिला जाणार आहे. कोल्हापूर शहरातील गणेशेत्सवाची आगमन मिरवणूक राजारामपुरीतील जनता बाजार चौक ते मारुती मंदिर मार्गावर गणेशचतुर्थी दिवशी सायंकाळी पाच ते रात्री बारापर्यंत निघते. याच मिरवणुकीतून गणेशोत्सवातील उत्साह, विसर्जन मिरवणुकीची झलक दिसते. मिरवणूक मार्गावर प्रवेश करताना वादाचे प्रसंग उद्भवतात. या पार्श्वभूमीवर सोडतीच्या माध्यमातून मंडळांचा क्रम ठरविण्याचा निर्णय गेल्या काही वर्षापूर्वी झाला आहे.
याच सोडतीमध्ये जय शिवराय मित्र मंडळ (जे.एस.ग्रुप) या दौलत नगरातील मंडळाला पाहिला क्रमांक मिळाला आहे. त्यांच्या मंडळापासून सायंकाळी पाच वाजता आगमन मिरवणूक सुरू होणार आहे. रात्री बारापर्यंत ही मिरवणूक सुरू राहणार आहे. मिरवणुकीत मोठी साऊंड सिस्टीम आणि लेसर किरणांचा वापर करणार नसल्याचीही ग्वाही मंडळाच्या कार्यकर्त्यांनी दिली असल्याचे पोलिसांनी सांगितले. तसेच मुख्य मार्गावर दुपारी चारपर्यंत इतर मंडळांना प्रवेश दिला जाणार आहे. सायंकाळी पाच ते रात्री बारा दरम्यान इतर मंडळांना पर्यायी मार्गाचा वापर करावा लागणार आहे.
दरम्यान, ज्या मंडळांना मुख्य मार्गावर जाता येणे शक्य नाही त्यांना पर्यायी मार्गाने मिरवणूक काढता येणार आहे. तसेच केवळ सात तासांमध्ये ४३ मंडळांना मुख्य मार्गावर प्रवेश मिळणार काय, असाही प्रश्न उपस्थित झाला आहे. संपूर्ण राजारामपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत एकूण २२३ सार्वजनिक मंडळे आहेत. त्यापैकी केवळ ४३ मंडळे मुख्य मिरवणुकीत मुख्य मार्गावरून जाणार आहेत. उर्वरीत मंडळांचे नियोजन अद्याप ठरलेले नाही.
मोठी साऊंड सिस्टीम लावणार नाही, लेसरचा वापर करणार नाही अशी ग्वाही मंडळांच्या कार्यर्त्यांनी दिली असली तरीही प्रत्यक्षात त्याची किती अंमलबजावणी होणार आहे. हे त्याच दिवशी स्पष्ट होईल. ज्यांच्याकडून मोठ्या साऊंड सिस्टीमचा वापर होईल, लेसरचा वापर होईल त्यांच्यावर कारवाई केली जाणार असल्याचे यापूर्वीही पोलिस अधीक्षकांनी स्पष्ट केले आहे. आता प्रत्यक्षात कारवाई किती होते यावर विसर्जन मिरवणुकीचा अंदाज येणार आहे.
गणेश चतुर्थी दोन-तीन दिवसांवर असतानाही गणेश आगमन मिरवणुका जल्लोषाने सुरु आहेत. मंडळाचे कार्यकर्ते मोठी साऊंस सिस्टीम आणि लेसर किरणांचा वापर करून स्वागत करीत आहेत. त्यांच्यावर कारवाई होताना दिसून येत नाही, अशी प्रतिक्रीया व्यक्त होत आहेत.
आमगन मिरवणुकीत ४३ मंडळांनाच परवानगी!राजारामपुरीतील ४३ मंडळांनाच परवानगी आगमन
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -