Home ब्रेकिंग चतुर्थीच्या तोंडावर परब कुटुंबीयांवर कोसळला दुःखाचा डोंगर; गणपतीची आरास करताना करंट लागून बस कंडक्टरचा दुर्दैवी मृत्यू

चतुर्थीच्या तोंडावर परब कुटुंबीयांवर कोसळला दुःखाचा डोंगर; गणपतीची आरास करताना करंट लागून बस कंडक्टरचा दुर्दैवी मृत्यू

0
चतुर्थीच्या तोंडावर परब कुटुंबीयांवर कोसळला दुःखाचा डोंगर; गणपतीची आरास करताना करंट लागून बस कंडक्टरचा दुर्दैवी मृत्यू

गणपतीची आरास करताना विजेचा धक्का (Electric Shock) लागून सरमळे-देऊळवाडी येथील एकाचा मृत्यू झाला. रमाकांत शिवराम परब (वय ५०) असे त्यांचे नाव आहे. ही घटना काल (रविवार) सकाळी ९ वाजता घडली.गणेश चतुर्थीच्या तोंडावरच त्यांच्या अकाली मृत्यूमुळे परब कुटुंबीयांवर (Parab Family) दुःखाचा डोंगर कोसळला आहे. याबाबत अधिक माहिती अशी, की कोकणात सध्या गणेश चतुर्थीच्या तयारीची लगबग सुरू आहे. रमाकांत परब हे काल सकाळी घरात गणपतीची आरास करत होते. टेबलवर उभे राहून ते वायरिंग करत होते.त्यावेळी त्यांना अचानक विजेचा धक्का लागला. त्यामुळे ते तोल जाऊन खाली कोसळले. त्यांना तातडीने बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात (Banda Primary Health Centre) दाखल करण्यात आले. याठिकाणी वैद्यकीय अधिकारी डॉ. गजानन सारंग यांनी त्यांना मृत घोषित केले. रमाकांत परब हे खासगी आराम बसमध्ये वाहक होते.घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी बांदा आरोग्य केंद्रात धाव घेतली. त्यांच्या अकाली मृत्यूमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. बांदा आरोग्य केंद्रात शवविच्छेदन करून तो सायंकाळी उशिरा नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here