Friday, June 27, 2025
Homeकोल्हापूरसापावर पाय पडल्याच्या भीतीनं इंग्रजी शाळेतील विद्यार्थ्याचा मृत्यू; तापानं फणफणतं होतं अंग,...

सापावर पाय पडल्याच्या भीतीनं इंग्रजी शाळेतील विद्यार्थ्याचा मृत्यू; तापानं फणफणतं होतं अंग, CPR मध्ये नेलं पण..

वाकरे (ता. करवीर) येथे बालकाचा सापावर (Snake) पाय पडल्याच्या भीतीने ताप येऊन मृत्यू झाला. अर्णव नवनाथ चौगले (वय ८) असे त्‍याचे नाव आहे.घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, गावातील एका खासगी इंग्रजी शाळेत (English Medium School) इयत्ता दुसरीमध्ये अर्णव शिकत होता. गुरुवारी तो शाळेला गेला होता. शाळेतून आल्यानंतर त्याला जोरात ताप भरून आला. याच दिवशी गावात आणखी एका तरुणाला सर्पदंश झाल्याची चर्चा होती. भीतीपोटी अर्णव माझाही सापावर पाय पडला, असे सांगत होता. या भीतीने त्याला ताप आला. घरच्यांनी सर्पदंश झाला असेल या भीतीपोटी सीपीआरमध्ये (CPR Hospital) उपचार सुरू केले. उपचार सुरू असतानाच शुक्रवारी अस्वस्थ वाटू लागल्याने शनिवारी त्याला एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू केले. ताप वाढल्याने अर्णव कोम्यात गेला. उपचारादरम्यान काल त्याचा मृत्यू झाला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -