Sunday, December 22, 2024
Homeसांगलीसांगलीतील व्यापाऱ्याची पाच लाखांची फसवणूक

सांगलीतील व्यापाऱ्याची पाच लाखांची फसवणूक

शहरातील पटेल चौक येथे असणाऱ्या हार्डवेअर विक्रेत्या व्यापाऱ्याकडून साहित्य घेऊन न वटणारे त्याला चेक देऊन ४ लाख ९० हजार ५८८ रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला. सदर फसवणुकीची घटना हि दि. १९ मार्च २०२३ ते शनिवार दि. १६ सप्टेंबर २०२३ या कालावधीत घडली. या प्रकरणी अली असगर अब्बास अली नयानी (वय २५ रा. सांगली) याने शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

त्याच्या
हार्डवेअरचे साहित्य घेऊन न वटणारे दिले चेक पैसे देत नसल्याने अखेर आपली
फिर्यादीवरून पोलिसांनी ४ लाख ९० हजार ५८८ रुपये फसवणूक प्रकरणी दिपककुमार गुप्ता (रा. चिंचवड पुणे) याच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, अली असगर नयानी यांचा शहरातील पटेल चौक येथे महाराष्ट्र हार्डवेअर या नावाने दुकान असून त्यांचा हार्डवेअर विक्रीचा व्यवसाय आहे.

संशयित दीपक गुप्ता याने त्यांच्या दुकानात येऊन वेल्डिंग मशिन, लिफ्टिंग हुक, सेफ्टी बेल्ट, वेल्डिंग सॉकेट, टॉर्च असे एकूण
किमतीचे साहित्य खरेदी केले. यावेळी त्याने फेडरल बँकेचा अथणी शाखेचा चेक दिला आणि माल घेऊन गेला.
सदरचा चेक हा नयानी यांनी सांगलीतील जीपी पारसी बँकेत दोन वेळा टाकला असता तो वटला नाही. त्यानंतर नयानी यांनी संबंधित दीपक गुप्ता याच्या मोबाईलवर तसेच व्हाटसअपवर वेळोवेळी विचारणा केली असता गुप्ता हा पैसे देण्यास टाळाटाळ करू लागला.

वारंवार मागणी करूनही
फसवणूक झाल्याचे निदर्शनास येताच नयानी यांनी सांगली शह पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी फसवणूक केल्या प्रकरणी दीपक गुप्ता याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, संशयित दीपक गुप्ता याच्या मोबाईलचा सीडीआर काढून त्याचा शोध आता पोलीस घेत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -