Sunday, December 22, 2024
HomeBlogगणेश चतुर्थी प्राणप्रतिष्ठापणा पूजा विधी आणि मंत्रोपासना याबाबत जाणून घ्या.

गणेश चतुर्थी प्राणप्रतिष्ठापणा पूजा विधी आणि मंत्रोपासना याबाबत जाणून घ्या.

गणेश चतुर्थी प्राणप्रतिष्ठापणा पूजा विधी आणि मंत्रोपासना याबाबत जाणून घ्या.

गणपती बाप्पाला विघ्नहर्ता म्हंटलं जातं. आपल्यावर आलेली विघ्न गणपती बाप्पा दूर करतो. तसेच पूजेत आणि कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात करण्यासाठी गणपती बाप्पाला पहिलं आव्हान केलं जातं. त्यामुळे कोणत्याही शुभ कार्यात येणारे अडथळे दूर होतात. गणपती ऋद्धि-सिद्धी यांचा स्वामी आहे. त्यामुळे त्यांच्या कृपेने सुख आणि समृद्धीचा कोणतीही उणीव भासत नाही. गणपती बाप्पाला दूर्वा आणि मोदक अत्यंत प्रिय आहेत. गणेश चतुर्थीला प्राणप्रतिष्ठापना करण्यासाठी मुहूर्त कोणता आणि कसं करावं याबाबत अनेक प्रश्न पडले असतील. चला मग याबाबत सविस्तर जाणून घेऊयात

गणेश चतुर्थी मुहूर्त
पंचांगानुसार, गणपती मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्यासाठी उदय तिथीनुसार 19 सप्टेंबर हा दिवस असणार आहे. सकाळी 10 वाजून 49 मिनिटं ते दुपारी 1 वाजून 16 मिनिटांपर्यंत हा मुहूर्त असणार आहे. गणेश चतुर्थीला 300 वर्षानंतर एक विशेष योग जुळून आला आहे. गणेश चतुर्थीला ब्रह्म योग आणि शुक्ल योग असणार आहे. पंचांगानुसार हा योग जवळपास 300 वर्षांनी आला आहे.

गणेश पूजा विधी
पहाटे उठल्यानंतर स्नान विधी आटपून घ्या. त्यानंतर गणपतीची छोटी मूर्ती घ्या.ताम्हणात छोट्या चौरंगावर लाल आसनावर गणेश मूर्ती स्थापित करा. तीन वेळा आचमन करा आणि पाणी जमिनीवर सोडा. त्यानंतर गणपतीचं आव्हान करून मूर्तीवर गंगाजलने अभिषेक करा. गणपतीचा अभिषेक करत असातना ओम गं गणपतेय नम: या मंत्राचा जप करा गणपतीला लाल रंगाचं पुष्प अर्पित करा. गणपतीला शेंदूर आणि दूर्वा अर्पण करा. त्यानंतर 21 मोदकांचा नैवेद्य घ्या. तसेच पूजा करताना काही चूक झाली तर माफी करा असं गाऱ्हाणं घाला. दिवसभर जमल्यास उपवास धरा. तसेच गणपतीच्या मंत्रांचा जप करा.

गणेश चतुर्थीला चंद्रदर्शन निषेध
धार्मिक मान्यतेनुसार, गणेश चतुर्थीला गणपतीचं दर्शन घेतलं जात नाही. यामुळे आपल्यावर चोरीचा खोटा आळ येतो असं सांगितलं जातं. पुराणानुसार, भगवान कृष्णांनी गणेश चतुर्थीला चंद्रदर्शन केलं होतं. त्यामुळे त्यांच्यावरही चोरीचा आळ आला होता. त्यामुळे या दिवशी चंद्राकडे पाहिलं जात नाही. गणपतीने चंद्राला शाप दिल्याची पौराणिक कथा आहे. जर चुकून चंद्रदर्शन झालं तर “सिंहःप्रसेनमवधीत् , सिंहो जाम्बवता हतः।सुकुमारक मा रोदीस्तव, ह्येष स्यमन्तकः।।” या मंत्राचा 108 वेळा जप करावा. त्याचबरोबर श्रीमद्भागवतच्या दहाव्या खंडातील 57 व्या अध्याय वाचावा. यामुळे चंद्र दर्शनाचा दोष दूर होतो.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -