Thursday, March 13, 2025
Homeइचलकरंजीइचलकरंजीत ढोल-ताशाच्या गजरात गणरायाचे जल्लोषात स्वागत!

इचलकरंजीत ढोल-ताशाच्या गजरात गणरायाचे जल्लोषात स्वागत!

गणपती बाप्पा मोरया.. चा अखंड जयघोष, पारंपारिक वाद्यांच्या गजर, फटाक्यांची आतषबाजी, गुलालाची उधळण करत वखनगरीत विघ्नहर्त्या गणरायाचे गणेशभक्तांनी उत्साही मंगलमय वातावरणात स्वागत केले. इचलकरंजी शहर व परिसरात श्री गणेशाचे मंगळवारी वाजत-गाजत धुमधडाक्यात स्वागत करण्यात आले. असंख्य सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांबरोबरच घरोघरी उदंड उत्साहात आणि पावसाने हजेरी लावली होती. त्यामुळे गणेश आगमनादिवशी पाऊस पडेल अशी भिती कार्यकर्त्यांमध्ये होती. दिवसभर पावसाने उघडीप दिली होती. मात्र, सायंकाळच्या सुमारास पावसाने हजेरी लावल्याने कार्यकर्त्यांसह नागरिकांची एकच धावपळ उडाली.

इचलकरंजी – वस्त्रनगरीत मंगलमय वातावरणात गणरायाचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. घरगुती गणपती बरोबरच सार्वजनिक गणेश मंडळांनी दिवसभर मिरवणुकीने
श्रींची प्रतिष्ठापना केली. वातावरणात गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली. दरम्यान, सार्वजनिक मंडळांच्या गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना रात्री उशिरापर्यंत सुरु होती.
सकाळपासूनच घराघरात श्री च्या प्रतिष्ठापनेची जय्यत तयारी सुरू होती. विद्युत रोषणाई, रंगीबेरंगी माळांसह सजवलेले टेबल, चौका-चौकांमध्ये बॅरिकेटस् मिरवणुक मार्गामध्ये वाहनांचा अडथळा होऊन वाहतुक कोंडी होऊ नये म्हणून शहर वाहतूक शाखेने राजवाडा चौक, के. एल. मलावादे चौक, श्री शिवतीर्थ या ठिकाणी बॅरिकेटस लाऊन पोलिस बंदोबस्त ठेऊन वाहतुक वळविण्यात आली होती.

त्यामुळे मिरवणुकीमध्ये कोणताही अडथळा आला नाही.
पूजा करून प्रतिष्ठापना करण्यात चित्ताकर्षक आरास, विघ्नहर्त्या गणरायाची भक्तीभावे विधिवत शहरातील मानाच्या गणपतीचे आणि विविध गणेशोत्सव मंडळांच्या गणेश मूर्तीचे वाजत- गाजत मिरवणुकीने आगमन झाले. शासनाने मूर्तीच्या उंचीवरील निर्बंध हटविल्याने बहतांशी गणेशोत्सव मंडळांनी भव्य आणि दिव्य अशा
आकर्षक श्री मूर्ती आणल्या असून जवळपास ५ फुटापासून ते २५ फुटापर्यंत श्री मूतीची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. गणरायाचे आगमन झाले असून काही मोजक्याच मंडळांच्या कार्यकत्यांची देखावे तयार करण्याची लगबग सुरु झाली आहे. यंदा विविध स्पातील चित्ताकर्षक अशा सुबक
आणि भव्यदिव्य अशा मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यावर अधिक भर देण्यात आला आहे.

सकाळी पारंपारिक वेशभूषा अनेक मंडळांनी गणेश आगमना दिवशी पारंपारिक वाद्यांवर भर दिल्याचे दिसून आले. त्याचबरोबर कार्यकर्ते सुद्धा वेगवेगळ्या रंगाचे कुर्ता- पायजमा परिधान केल्याने श्रींच्या मिरवणूकीला एक वेगळाच रंग – प्राप्त झाल्याचे दिसत होते. साहित्यामध्ये दरवाढ होऊनही बाजारातून या वस्तूंना चांगला उठाव होता. रविवारपासूनच शहरातील विविध भागातील सार्वजनिक मंडळांनी आपली श्री मूर्ती महात्मा गांधी पुतळा परिसरात आणून ठेवली होती. दुपारनंतर वाद्यांच्या गजरात आणि जल्लोषात या श्री मूर्ती भागाभागात रवाना होत होत्या.

मंगळवारपासून दहा दिवस सुरू झालेल्या गणेशोत्सवाच्या कालखंडात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता..शहरातील कॉ. के. एल. मलाबाद चौक ते गांधी पुतळा या मुख्य मार्गावरील बाजारपेठ गर्दीने ओसंडून वाहत होती. हार-तुरे, फुलं यासह सजावटीचे सायंकाळनंतर अनेक मंडळांनी सायंकाळनंतर मिरवणुकीने गणरायाचे आगमन सुरू केले होते. त्यामध्ये अनेक मंडळांनी आकर्षक रोषणाई केली होती. त्यामुळे रात्रीच्या सुमारास परिसर उजळून निघाला होता.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -