Sunday, September 8, 2024
Homeसांगलीसांगलीत भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन!! 600 हून अधिक तरुणांना मिळणार नोकऱ्या

सांगलीत भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन!! 600 हून अधिक तरुणांना मिळणार नोकऱ्या


शिंदे-फडणवीस सरकारकडून राज्यात “शासन आपल्या दारी” हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत आता येत्या 25 सप्टेंबर रोजी सांगली जिल्ह्यात शासनाकडून रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. मेळाव्याच्या अंतर्गत राज्यातील तरुणांना रोजगार मिळवून देण्याचा हेतू आहे. मुख्य म्हणजे, रोजगार मेळाव्यामुळे सांगली जिल्ह्यातील 600 पेक्षा जास्त तरुणांना रोजगार देण्यात येणार आहे. त्यामुळे “सांगली जिल्ह्यातील तरुणांनी मोठ्या संख्येत या रोजगार मेळाव्यात सहभाग नोंदवावा” असे आवाहन राज्य सरकारकडून करण्यात आले आहे.

येत्या 25 सप्टेंबर रोजी सांगली जिल्ह्यात पंडित दीनदयाळ रोजगार योजनेच्या माध्यमातून हा रोजगार मेळावा घेतला जात आहे. या मेळाव्यामध्ये, एचएमसी ऑपरेटर, सीएनसी व्हीटीएल ऑपरेटर, शिफ्ट सुपरटिव्हीझर, टर्नर, वेल्डर, व्हीएमसी ऑपरेटर, एचएमसी ऑपरेटर, व्हीटीएल सीएनसी ऑपरेटर, सीएनसी एम/सी ऑपरेटर, मदतनीस, इलेक्ट्रिशियन, अकाउंट्स एक्झिक्युटिव्ह, क्वालिटी इन्स्पेक्टर, सेल्स असिस्टंट/ऑफिस क्लर्क, शिफ्ट पर्यवेक्षक, डिजिटल मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह, प्रेस मशीन ऑपरेटर, टर्नर अशा अनेक पदांसाठी उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे.

परंतु सर्वात प्रथम या रोजगार मेळाव्यात सहभाग नोंदवण्यासाठी इच्छुक उमेदवारांन https://rojgar.mahaswayam.gov.in/ लिंकवर जाऊन रोजगार मेळाव्यासाठी नोंदणी करण्याची आवश्यकता आहे. नोंदणी केलेल्या उमेदवारांनाच फक्त मेळाव्यात सहभागी होता येणार आहे. या मेळाव्यामध्ये ऑफलाइन पद्धतीने उमेदवाराची निवड केली जाईल. यासाठी उमेदवाराकडे संबंधित पदासाठी आवश्यक पदवी असणे गरजेचे आहे. येत्या २५ सप्टेंबर रोजी सांगली जिल्हयात हा रोजगार मेळावा होणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -