Tuesday, May 21, 2024
Homenewsव्वा रे बिट्या तुला कुणी सांगितलं? असे जयंत पाटील किरीट सोमय्यांना का...

व्वा रे बिट्या तुला कुणी सांगितलं? असे जयंत पाटील किरीट सोमय्यांना का म्हणाले?


भाजप नेते किरीट सोमय्या म्हणतात महाराष्ट्रातील अर्ध मंत्रिमंडळ हॉस्पिटलमध्ये तर अर्ध तुरुंगात जाईल. व्वा रे बिट्या तुला कुणी सांगितलं? असा सवाल करतानाच ईडीची नोटीस येण्याआधी किरीट सोमय्या, चंद्रकांत पाटील यांना कसं कळतं? याचा अर्थ भाजपतर्फे तपास यंत्रणेचा गैरवापर केला जात असल्याचा थेट आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी पारनेर येथे बोलताना केला.
महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्यासाठी कट-कारस्थान रचलं जात आहे. मंत्र्यांचं नावं घ्या, नाहीतर तुमच्यावर कारवाई करू, असे सांगून खोट्या गोष्टी पसरवल्या जात आहेत.
भाजप चुकीची संस्कृती महाराष्ट्रात आणू पाहत आहे. ही गोष्ट आपल्याला थांबवायची आहे. त्यासाठी आपले संघटन मजबूत करायला हवे, असे आवाहन जयंत पाटील यांनी (Jayant Patil) राष्ट्रवादी परिवार संवादात केले.

यावेळी आमदार निलेश लंके, महिला प्रदेशाध्यक्ष रुपालीताई चाकणकर, युवक प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख, युवक कार्याध्यक्ष सूरज चव्हाण, युवती प्रदेशाध्यक्ष सक्षणा सलगर, विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे, डॉक्टर सेलचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र काळे, निरीक्षक अंकुश काकडे, जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके आदींसह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -