Friday, February 23, 2024
Homenewsदेवेंद्र फडणवीस यांनी घेतली अमित शहांची भेट

देवेंद्र फडणवीस यांनी घेतली अमित शहांची भेट


विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी सकाळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (fadanvis meets amit shah) यांची भेट घेतली. मराठवड्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानाची माहिती देण्यासाठी त्यांनी शहा यांची भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे. २८ तारखेला रात्री उशिरा ते दिल्लीत दाखल झाले होते. राज्यातील अनेक ठिकाणी पुर आला आहे.
अशात केंद्राकडून जास्तीत जास्त मदत कशी करता येईल, यासंबंधी त्यांनी शहा यांच्या सोबत चर्चा केल्याचे बोलेले जात आहे. शिवाय राज्यातील राजकीय परिस्थितीसंबंधी देखील त्यांनी शहा यांना माहिती दिल्याचे कळतेय.
देवेेंद्र फडणवीस गोवा विधानसभा निवडणुकीचे प्रभारी आहेत. अशात गोवा निवडणुकीसंदर्भात बैठकीत चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यांच्यासमवेत गोव्याचे मंत्री मायकल लोबो देखील उपस्थित होते.

२० आणि २१ सप्टेंबरला फडणवीस यांनी गोव्याचा दौरा केला होता. या दरम्यान त्यांनी निवडणुकीचा आढावा घेण्यासाठी बैठका देखील घेतल्या होत्या.
यासंबंधीचा अहवाल त्यांनी शहांकडे सादर केल्याची माहिती समोर आली आहे. लवकरच फडणवीस मराठवड्याचा दौरा करणार आहेत. दौरा अहवाल ते भाजपच्या वरिष्ट नेत्यांना सादर करतील. या संबंधीदेखील बैठकीत चर्चा झाल्याचे बोलले जात आहे. (fadanvis meets amit shah)

RELATED ARTICLES
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -