Monday, December 23, 2024
Homeइचलकरंजीइचलकरंजीत देखावे पहाण्यासाठी तोबा गर्दी

इचलकरंजीत देखावे पहाण्यासाठी तोबा गर्दी

घरगुती गौरी-गणपतींचे विसर्जन झाल्यानंतर आता सार्वजनिक गणेश मंडळांचे देखावे पहाण्यासांठी गर्दी होताना दिसत आहे. रविवार असल्याने रस्ते गर्दीने फुलून गेले होते. त्याचबरोबर फेस्टीवल मध्येही नागरिकांनी तोबा गर्दी केली होती.

शनिवारी घरगुती गौरी गणपतींचे विसर्जन झाले. त्यानंतर सार्वजनिक मंडळांचे देखावे पहाण्यासाठी रविवारी नागरिक सहकुटुंब सहपरिवार तसेच गटागटाने घराबाहेर पडले होते. यामुळे शहरातील सर्वच रस्ते गर्दीने फुलून गेले होते.

शहरातील नामवंत अशा गांधी कॅम्प (ट्रस्ट) मंडळाने यंदाही आपली हालत्या देखाव्याची परंपरा कायम जपली आहे. वाघ्या मुरळीचे नृत्य हा देखावा गणेशभक्तांना आकर्षित करताना दिसत आहे. त्याचबरोबर गांधी कॅम्प युवक मंडळानेही नृसिंह अवतार हा पौराणिक देखावा सादर केला आहे. तर कलानगर गणेशोत्सव मंडळाने यंदा भव्यदिव्य अशी सांगलीतील गणपती मंदिराची हुबेहुब प्रतिकृती साकारली आहे.

दरवर्षीप्रमाणे अनेक सार्वजनिक गणेश मंडळांनी आकर्षक आणि विविध रूपातील श्री मुर्ती आणण्यावर भर दिला असल्याचे दिसते. देखावे पहाण्यास तसेच फेस्टिवलचा आनंद लुटण्यास नागरिकांनी एकच गर्दी केली होती. गर्दीमुळे दुचाकी तसेच चारचाकी वाहनधारकांना वाट काढताना चांगलीच दमछाक होताना दिसत होती.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -