पट्टणकोडोली : पट्टणकोडोली (ता. हातकणंगले) येथील रेश्मा बाळासो कांबळे ( वय ४५) यांनी घरातील स्लॅबच्या सळईला साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना शनिवारी सायंकाळी घडली. आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही.
त्या रेश्मा या मूळच्या हातकणंगले तालुक्यातील हालोंडी येथील असून पट्टणकोडोली त्यांचे माहेर आहे. मुलांसोबत येथील भाड्याच्या घरात राहात होत्या. दुकानात काम करून त्या उदरनिर्वाह करीत होत्या. त्यांना तीन मुली, एक मुलगा असून गेली सहा ते सात वर्षे त्या पट्टणकोडोलीतच राहात होत्या.
याबाबतची वर्दी सुगंधा दगडू दाभाडे यांनी हुपरी पोलिस ठाण्यात दिली. अधिक तपास पोसई हजारे तपास करीत आहेत.