Friday, December 27, 2024
Homeकोल्हापूरपूर नुकसान पाहणीसाठी येणार केंद्रीय पथक

पूर नुकसान पाहणीसाठी येणार केंद्रीय पथक



जिल्ह्यात जुलै महिन्यात महापुराने झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी तीन महिन्यांनी केंद्रीय पथक कोल्हापुरात येणार आहे. आठ सदस्यीय हे पथक दि. 5 ऑक्टोबर रोजी कोल्हापूरला भेट देण्याची शक्यता आहे. केंद्र शासनाच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या सहसचिवांच्या अध्यक्षतेखाली आठ सदस्यांचा या पथकात समावेश आहे. तीन महिन्यांनंतर हे पथक नुकसान झालेल्या ठिकाणी काय बघणार, असा सवाल यानिमित्ताने उपस्थित होत आहे.

जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जिल्ह्यात पूरस्थिती गंभीर झाली होती. या महापुराने जिल्ह्याचे दीड हजार कोटींवर नुकसान झाले. पुरासह भूस्खलनाने शेतीचेही अतोनात नुकसान झाल्याने केंद्र शासनानेही मदत करावी, अशी मागणी राज्य सरकारने केली होती.

जिल्ह्यात सुमारे दीड हजार कोटींचे नुकसान झाले आहे. मात्र, राज्य शासनाने 148 कोटींचा निधी उपलब्ध करून दिला आहे. यामध्ये शेतीचे नुकसान झालेल्या शेतकर्‍यांना अद्याप कोणत्याही प्रकारची मदत दिलेली नाही. जी मदत उपलब्ध करून दिली आहे, तीही झालेल्या नुकसानीच्या तुलनेत तुटपुंजी असल्याचे पूरग्रस्तांचे म्हणणे आहे.

या सर्व पार्श्वभूमीवर केंद्र शासनाचे पथक पूर नुकसानीच्या पाहणीसाठी कोल्हापुरात येणार आहे. मात्र, महापूर येऊन जवळपास तीन महिनेे उलटले आहेत. महापुराने झालेल्या नुकसानीतून पूरग्रस्त आता सावरत आहेत. तीन महिने उलटल्याने झालेल्या नुकसानीची तीव—ता पथक कसे समजून घेणार, असा सवाल उपस्थित होत आहे. नुकसानीचे नेमके चित्र आता दिसणार नाही. त्यावरच आधारित अहवाल तयार झाला, तर या पथकाची पाहणी हा केवळ फार्सच ठरेल. यामुळे केंद्र शासनाकडून मिळणार्‍या मदतीवरही मर्यादा येईल, अशी भीतीही पूरग्रस्तांकडून व्यक्त होत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -