जिल्ह्यातील सर्वात मोठे जलाशय असणार्या व सीमाभागासह शेती व पिण्याची तहान भागवणार्या काळम्मावाडी धरणाला गळतीचे ग्रहण लागल्यामुळे धरणाच्या मजबुतीविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर पाटबंधारे विभागातील अधीक्षक अभियंता महेश सुर्वे यांच्या पथकाने धरण क्षेत्राला भेट देऊन पाहणी केली असून, याविषयी वरिष्ठ पातळीवर चर्चा करून तातडीने गळती थांबवण्यासाठी त्वरित संबंधित यंत्रणा कार्यान्वित करणार असल्याचे या पथकाने सांगितले आहे.
दरम्यान, पुण्याचे पथक धरणाच्या गळतीची सोमवारी पाहणी करणार आहे. गळती काढण्यासाठी बोअर घेण्यासाठी यंत्रसामग्री धरणस्थळी दाखल झाली आहे.
काळम्मावाडी धरण हे 646.00 मीटर (25.40 टीएमसी) पाणीसाठा क्षमता असलेला प्रकल्प असून या धरणाच्या बांधकामास सन 1977 साली सुरुवात झाली आहे. तब्बल बावीस वर्षांनी म्हणजे 1999 साली या धरणाचे बांधकाम पूर्ण झाले असून दुसर्याच वर्षी म्हणजे 2000 साली या धरणातून प्रतिसेकंद 70 लिटर नैसर्गिक गळती मान्य असताना 398 लिटर प्रतिसेकंद गळती सुरू झाली होती, पण मध्यंतरी लाखो रुपये खर्च करून ग्राऊटिंग करून ही गळती काही प्रमाणात कमी करण्यास यश मिळाले असले तरी ही गळती सतत कमी-अधिक झालेली दिसून येते.
मेघोली धरणफुटीचा आठवणी ताज्या असताना दूधगंगा नदीकाठावरील नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. तरी या गळतीविषयी त्वरित पाटबंधारे विभागाने गळती कमी करण्यासाठी पावले उचलून धरण मजबुतीकरणावर भर द्यावा, अशी मागणी या पंचक्रोशीतील जनतेने केली आहे.
या पाहणी पथकात अधीक्षक अभियंता महेश सुर्वे, कार्यकारी अभियंता रोहित बांदिवडेकर, अमोल नाईक, सहायक अभियंता भाग्यश्री पाटील, कल्याणी कालेकर, कनिष्ठ अभियंता अंजली कारेकर, अमोल गोधडे कर्मचारी महादेव सावंत, यशवंत पाटील, प्रकाश रेवडेकर, अशोक जाधव, शामराव शिंदे, अनिल चौगले, ज्ञानदेव राणे उपस्थित होते.
सद्यस्थितीत धरण शंभर टक्के भरले असून धरणातून प्रतिसेकंद 191 लिटर पाण्याची गळती सुरू असून या पार्श्वभूमीवर पाटबंधारे विभागातील अधीक्षक अभियंता पथकाने धरण क्षेत्राला भेट देऊन पाहणी केली आहे. याविषयी वरिष्ठ पातळीवर चर्चा करून तातडीने गळती थांबवण्यासाठी त्वरित संबंधित यंत्रणा कार्यान्वित करणार असल्याचे पथकाकडून सांगण्यात आले.
काळम्मावाडी गळतीची अधिकार्यांकडून पाहणी; पुण्याचे पथक करणार पाहणी
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -